-
आवाजानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रेया घोषालचं सौंदर्य आरस्पानी आहे. एखाद्या अभिनेत्रीप्रमाणेच श्रेयाचं सौंदर्य खुलून दिसतेय.
-
दूरचित्रवाणीवरील सा रे गा मा पा मध्ये श्रेयाची जादू पाहायला मिळाली.
-
संजय लीला भंसाळी यांच्या देवदास या चित्रपटातून श्रेयानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
२००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या देवदास या चित्रपटांमध्ये श्रेयानं मोरा पिया आणि डोला रे डोला ही प्रसिद्ध गाणी गायली आहे.
-
पहिल्याच चित्रपटासाठी श्रेयाला प्लेबॅक सिंगर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
-
राष्ट्रीय पुरस्कारासोबत श्रेयाला फिल्मफेअरचे Best Female Playback Singer आणि RD Burman Award for New Music Talent असे पुरस्कार मिळाले.
श्रेया घोषालनं फक्त हिंदीच नव्हे तर १४ भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. -
हिंदी, मराठी, तामिळ, कनडा, बंगाली, मल्याळम, तेलगू, गुजराती. आसामी, नेपाळी, ओरीया, भोजपुरी, पंजाबी आणि तुली या भाषेत श्रेयानं आपल्या गाण्याची जादू दाखवली आहे.
-
तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली गायिका श्रेया घोषाल सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यासाठी सतत अपडेट देत असते.
-
श्रेया घोषाल चित्रपटातील गाण्यासह स्टेज शो करत असते. हे शो विविध देशात होत असतात.
-
लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज गायिकांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारी गायिका म्हणून श्रेया घोषालकडे पाहिले जातेय.
-
श्रेयाच्या आवाजाचे चाहते अनेक आहेत. एका देशात चक्क ‘श्रेया घोषाल दिन’ साजरा केला जातो.
अमेरिकेतल्या ओहिओ राज्यात २६ जून हा दिवस ‘श्रेया घोषाल डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तिची गाणी तिथे ऐकली जातात. २०१० मध्ये ओहिओचे तत्कालीन राज्यपाल टेड स्ट्रीकलँड यांनी श्रेयाला हा सन्मान दिला. -
श्रेया घोषालने तशी विविध पद्धतीची गाणी गायली असली तरी सौम्य, सुंदर चाली असलेली रोमँटिक गाणी ही तिची ओळख आहे.
-
श्रेयानं आतापर्यंत दोनशेपेक्षा आधिक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
-
श्रेयाला एकूण ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार व ७ दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
-
देवदास, मुन्नाभाई एमबीबीएस, खाकी , मै हू ना , धूम , परिणिता , ओमकारा , क्रिश , लगे रहो मुन्नाभाई , हे बेबी , लागा चुनरी मे दाग , सलामे इश्क , गुरू , रुस्तम यासारख्या चित्रपटासाठी श्रेयानं पार्श्वगायन केलं आहे.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”