‘माय नेम इज बॉण्ड.. जेम्स बॉण्ड!’ सर इयान फ्लेमिंग यांच्या लेखणीतून निर्माण झालेले हे करिश्माई वाक्य आपल्या अनोख्या शैलीत उच्चारणारा जेम्स बॉण्ड गेले अनेक वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेम्स बॉण्ड या व्यक्तिरेखेवर आधारित चित्रपट आणि सीरिजदेखील प्रदर्शित झाल्या आहेत. विशेष म्हणजे लोकप्रिय असणारी ही भूमिका हॉलिवूडमधील काही अभिनेत्यांनी साकारली आहे. १. डेव्हिड निवेन : अभिनेता डेव्हिड निवेनने जेम्स बॉण्ड सीरिजमध्ये काम केलं. 'कसिनो रॉयल' या सीरिजमध्ये तो झळकला आहे. डेव्हिडची ही अखेरची सीरिज असून ती फारशी गाजली नाही. (सौजन्य : सोशल मीडिया) २. जॉर्ज लेजनबी – बॉण्ड सीरिजमधून शियान कॉनरी रिटायर्ड झाल्यानंतर या सीरिजमध्ये जॉर्ज लेजनबी यांनी ही भूमिका साकारली. १९६९ मधील 'ऑन हर मॅजेस्टीक सिक्रेट सर्व्हिस'मध्ये जॉर्जने 007 जेम्स बॉण्डची भूमिका वठविली होती. (सौजन्य : सोशल मीडिया) ३. रॉजर मूर – रॉजरने १९७३ पासून १९८५ पर्यत जेम्स बॉण्डची भूमिका वठविली. या काळात त्याने प्रचंड लोकप्रियता मिळविली. तसंच या सलग ७ चित्रपटांमध्ये त्याने जेम्स बॉण्डची भूमिका साकारली. (सौजन्य : सोशल मीडिया) ४. टिमथी डाल्टन – रॉजर मोर यांच्या वाढत्या वयाच्या कारणामुळे त्यांच्याऐवजी टिमथी डाल्टन यांना जेम्स बॉण्ड म्हणून निवडण्यात आलं. १९८७ मधील 'द लिव्हिंग डेलाइट्स' या चित्रपटात त्यांनी जेम्स बॉण्ड म्हणून पहिल्यांदा काम केलं. (सौजन्य : सोशल मीडिया) ५. पियर्स ब्रॉसनन – खरंतर पियर्सने द लिव्हिंग डेलाइट्ससाठी ऑडिशन दिलं होतं. मात्र ही भूमिका टिमथी डाल्टनच्या वाट्याला आली. परंतु डाल्टनने हा चित्रपट सोडल्यानंतर ही भूमिका पियर्सला साकारण्याची संधी मिळाली. (सौजन्य : सोशल मीडिया) ६. डॅनियल क्रेग – ब्रॉसनननंतर डॅनियलची जेम्स बॉण्डसाठी निवड करण्यात आली. खरंतर सुरुवातीला अनेकांनी जेम्स बॉण्डसाठी त्याची निवड केल्यामुळे टीका केली होती. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. क्रेगने जवळपास 'कॉन्टम ऑफ सोलेस', 'स्काइफॉल' आणि 'स्पेक्टर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (सौजन्य : सोशल मीडिया)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”