अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांनी बालकलाकार ते मराठी चित्रपटविश्वातील प्रथितयश अभिनेत्री असा मोठा टप्पा पार केला आहे. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम) कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर रंगभूमी-चित्रपट आणि टेलिव्हिजन माध्यमांत झालेल्या बदलांनुसार जुळवून घेत कलाकार म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम) सध्या ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील आसावरीच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम) बालकलाकार म्हणून सुरुवात करणाऱ्या निवेदिता यांनी पुढे रंगभूमीवर बालनाटकांतून काम करता करता अभिनयाचे धडे गिरवले. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम) नव्वदच्या दशकांत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम) अभिनेत्री म्हणून मराठीत नावलौकिक कमावल्यानंतर घरसंसारात रमलेल्या निवेदिता यांनी त्यांचे पुनरागमनही रंगभूमीवरूनच केले. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम) ‘टिळक आगरकर’, ‘अखेरचा सवाल’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘हसत खेळत’ अशा विविध नाटकांमधून त्यांनी काम केले. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम) तब्बल तीस वर्षे वेगवेगळ्या माध्यमांमधून अभिनयाची मुशाफिरी के लेल्या निवेदिता यांनी चित्रपट निर्मितीचाही अनुभव घेतला आहे. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम) रंगभूमीवरच अभिनयाचे बाळकडू मिळाले आणि मनाजोगते कामही करता आले, असे म्हणणाऱ्या निवेदिता यांनी हिंदी चित्रपट-मालिकांमधूनही काम केले आहे. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम) कलाकार या एकाच प्रतिमेत अडकून न पडता त्यांनी ‘हंसगामिनी’ या नावाने स्वत:चा साडय़ांचा ब्रॅण्डही विकसित केला. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…