-
श्रुती हसन – कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन हिने 'लक' या चित्रपटातून २००९ साली अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.
-
हार्ड कौर – हार्ड कौर या गायिकेने 'पाटियाला हाऊस' या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.
-
अभिजीत सावंत – इंडियन आयडॉल विजेता अभिजीत सावंत याने 'लॉटरी' या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केलं.
-
आर्या आंबेकर – 'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' यातून प्रकाशझोतात आलेली गायिका आर्या आंबेकर हिने 'ती सध्या काय करते' या मराठी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.
-
सोनू निगम – आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध करणारा प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनं अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केलं आहे.
-
केतकी माटेगावकर – 'शाळा' या मराठी चित्रपटातून केतकी माटेगावकरनं अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.
-
आदित्य नारायण – गायक म्हणून काम करत असताना विक्रम भट्ट दिग्दर्शित 'शापित' या चित्रपटातून आदित्यने अभिनेता म्हणून पदार्पण केलं. तसेच यापूर्वी 'जब प्यार किसीसे होता है' आणि 'परदेस' या चित्रपटांमध्ये बालकलाकाराचे काम केलं.
-
मोनाली ठाकूर – या गायिकेने 'लक्ष्मी' या बंगाली चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.
-
मिका सिंग – सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे प्रसिद्ध गायक मिका सिंग यानं 'लूट' या चित्रपटात अभिनेता म्हणून पदार्पण केलं.
-
वसुंधरा दास – कमल हसन यांच्या 'हे राम' या चित्रपटातून वसुंधरा दास हिनं अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.
-
लकी अली – लकी अली यांनी 'छोटे नवाब' या चित्रपटातून १९६२ रोजी अभिनेता म्हणून पदार्पण केलं.
-
किशोर कुमार – प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी तब्बल ८६ चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलं आहे.
-
मियां चँग – 'बदमाश कंपनी' या चित्रपटातून मियां चँग या गायकाने अभिनेता म्हणून पदार्पण केलं.
-
हनी सिंग – 'मिर्झा द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून हनी सिंग अभिनेता म्हणून पदार्पण केलं.
-
हिमेश रेशमिया – प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियानं 'आपका सुरूर' या चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलं.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय