२०१२ मध्ये 'स्टुडन्ट ऑफ द इअर' या चित्रपटातून आलिया भट्टनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आठ वर्षांमध्ये आलियानं अनेक हिट चित्रपट दिले आहे. आता बॉलिवूडमध्ये आणखी एका आलियाची एण्ट्री होत आहे. जवानी जानेमन या चित्रपटातून आणखी एक आलिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या अभिनेत्रीचं नाव आलिया फर्निचरवाला असून ती अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. सैफ अली खानच्या मुलीची भूमिका या चित्रपटात आलिया करत आहे. तब्बूचीही या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. आलियापूर्वी सारा अली खान सैफच्या मुलीची भूमिका साकारणार होती. मात्र अखेरीस आलियाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नॉर्दर्न लाइट्स फिल्म्स या निर्मात्यानं २१ वर्षीय आलियाला जवानी जानेमनसह आणखी दोन चित्रपटांसाठी करारबद्ध केलं आहे. पूजा बेदी आणि पती फरहान फर्नीचरवाला यांची आलिया मुलगी आहे. २००३ मध्ये पूजा आणि परहान विभक्त झाले. २०११ मध्ये एका TV रियाल्टी शोमध्ये आलिया आई पूजा बेदीसोबत सहभागी झाली होती. आलियानं मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर न्यूयॉर्क विद्यापीठातून अभिनयाचं धडे गिरवले आहेत. आलिया पदर्पण करत असलेला 'जवानी जानेमन' हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाहा आलियाचा Bold and Hot अंदाज पाहा आलियाचा Bold and Hot अंदाज (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम @alaya.f )

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली