-
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही एफडी, बॉण्ड आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच मर्यादित पैसा खर्च करण्यावर विश्वास ठेवते. इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने ती कुठे पैसा खर्च करते, कुठे गुंतवणूक करायला आवडते, सर्वात पहिली गुंतवणूक कुठे केली, पहिला मोठा खर्च कोणता, कोणतं स्वप्न अद्याप बाकी आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
-
"मी बजेटमध्ये राहू शकते. विनाकारण खर्च करायला मला आवडत नाही. मी अजून पैसे का नाही खर्च करत असे मला माझे चार्टर्ड अकाउंटंट नेहमीच विचारत असतात. मी लहान होती तेव्हाही कधी महागड्या वस्तू खरेदी केल्या नाहीत. माझ्याकडे तेव्हा पैसे नसायचे".
"जेव्हा मी माझी आई (सोनी राजदान) आणि बहीण (शाहीन भट्ट) यांच्यासोबत लंडनला जायची तेव्हाही आम्हाला मर्यादित पैसेच खर्च करण्यासाठी मिळायचे". -
"दरवर्षी सुट्ट्यांमध्ये आम्ही तिथे जायचो. मी तेव्हा प्राइमार्कमध्ये (स्टोर) जाऊन 5-6 पाउंडचे टॉप खरेदी करायची. अजूनही मी माझे पायजमे तिथूनच खरेदी करते".
-
गुंतवणूक : "मला गुंतवणुकीबाबत जास्त माहिती नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये मी यात इंटरेस्ट दाखवलाय. माझं घर (जुहू, मुंबई) माझी स्वतःची पहिली प्रॉपर्टी आहे".
-
"मी फिक्स्ड डिपॉजिट आणि बॉण्डमध्ये गुंतवणूक करते. म्युच्युअल फंड चांगले असतात असं मला सांगण्यात आलंय".
पहिला मोठा खर्च : "लहानपणी मी स्वतःच्या पैशांनी घेतलेली पहिली सर्वात महागडी वस्तू म्हणजे Louis Vuitton ची बॅग". -
"मी सर्वाधिक खर्च बॅग्सवरती करते. मला बॅग खरेदी करायला खूप आवडतं आणि हो मला जिमच्या कपड्यांवरही खर्च करायला आवडतं".
-
"माझ्याकडे Lululemon चे जवळपास प्रत्येक प्रकारची ट्रॅकपँट आहे. जेव्हा मी एखाद्या दुकानात फिरत असते तेव्हा माझी बहिण मला पैसे खर्च करण्यापासून रोखते. तुला याहून अधिक पैसे खर्च करण्याची परवानगी नाहीये असं ती मला म्हणत असते".
-
"आता मी मर्यादित शॉपिंग करते. मला जिमचे कपडे खरेदी करण्याचा 'आजार' आहे असं माझ्या बहिणीला वाटतं ".
-
अजून कुठे खर्च : "मी सुट्ट्यांमध्ये खूप खर्च करते. खरं म्हणजे मी वर्षभरात एकदाच सुट्टी घेते आणि ती सुट्टी न्यू इयरच्या वेळी असते".
-
"मी डेस्टिनेशन आणि हॉटेलवर खर्च करते. सुट्ट्यांमध्ये शॉपिंग करायला मला आवडत नाही".
-
"प्राइवेट जेट खरेदी करणं लग्जरी असेल. मी यापूर्वी एक जेट चार्टर्ड केले होते, परंतु सुट्टीसाठी नाही. माझं लंडनमध्ये घर खरेदी करण्याचं स्वप्न होतं. ते मी 2018 मध्ये पूर्ण केलं".
-
"लंडनमध्ये माझं घर कॉवेंट गार्डनमध्ये असून माझी बहीण तिथे कधीकधी राहते".
-
"चहूबाजूंनी पर्वत असलेल्या ठिकाणी घर खरेदी करण्याचं माझं स्वप्न आहे. आयुष्यात नंतर मी हे स्वप्न पूर्ण करेन".

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक