फरदीन खानला एकेकाळी बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता म्हणून ओळखलं जात होतं. फरदीन खानच्या लूकमुळे अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या. फरदीनने १९९८ मध्ये ‘प्रेम अगन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण फ्लॉप चित्रपटांमुळे फरदीन खानला बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झालं होतं चित्रपटांपासून लांब गेल्यापासून तो खूपच जाड झाला आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वडील प्रसिद्ध दिग्दर्शक असल्याने हरमन बावेजाकडून बॉलिवूडला चांगल्याच अपेक्षा होत्या. २००८ मध्ये प्रियांका चोप्रासोबत ‘लव्ह स्टोरी २०५०’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटापेक्षाही प्रियांका चोप्रासोबत असलेल्या अफेअरमुळे तो जास्त चर्चेत राहिला. २००९ मध्ये तो प्रियांकासोबत ‘व्हॉट्स योअर राशी’ चित्रपटात झळकला. मात्र चित्रपट फ्लॉप झाला. चित्रपटापासून दूर गेल्यानंतर हरमन बावेजा इतका जाड झाला आहे की त्याला ओळखणंही कठीण आहे शादाब खान राणी मुखर्जीसोबत ‘राजा की आयेगी बारात’ चित्रपटात झळकला होता. फार कमी जणांना माहिती आहे की, शादाब खान हा अमजद खान यांचा मुलगा आहे. पण वडिलांप्रमाणे तो यश मिळवू शकला नाही. अभिनयात अयशस्वी झाल्यानंतर शादाब खान लेखनाकडे वळला आहे. त्याचा लूकही खूप बदलला असून खूप जाड झाला आहे. यश चोप्रा यांचा मुलगा असल्याने उदय चोप्राकडून बॉलिवूडला फार अपेक्षा होत्या. २००० मध्ये 'मोहब्बते' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटात शाहरुख, ऐश्वर्या, अमिताभ बच्चन यांच्यासहित भली मोठी स्टारकास्ट असल्याने चित्रपट हिट ठरला. पण उदय चोप्रा एकट्याच्या हिंमतीवर कोणताही चित्रपट यशस्वी करु शकला नाही. अखेर उदय चोप्राने अभिनयाला रामराम ठोकला आणि पडद्यामागे काम करण्यास सुरुवात केली. एकेकाळी फिट दिसणारा उदय चोप्रा अभिनयातून बाहेर पडल्यापासून खूपच जाड झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”