-
वसईमध्ये लहानाची मोठी झालेल्या अभिज्ञा भावेचा १३ मार्चला वाढदिवस असतो.
-
अभिज्ञाने डीजी रुपारेल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे.
-
‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेने सर्वप्रथम अभिज्ञा भावेला ओळख मिळवून दिली.
-
पहिल्याच मालिकेत अभिज्ञा भावेने नकारात्मक भूमिका रंगवली होती.
-
सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘तुला पाहते रे’ मध्ये सुद्धा अभिज्ञा भावेने महत्वाची भूमिका साकारली होती.
-
‘तुला पाहते रे’ मध्ये अभिज्ञाने सुबोध भावेच्या सेक्रेटरीची भूमिका साकारली होती.
-
दोन्ही गाजलेल्या मालिकांमध्ये अभिज्ञाने रंगवलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली.
-
अभिज्ञा भावेने मराठी मालिकांबरोबर मराठी चित्रपटातही भूमिका केली आहे.
-
'मूव्हींग आऊट' या वेबसीरीजमध्येही अभिज्ञा भावेने काम केले आहे.
-
अभियनाकडे वळण्याआधी अभिज्ञा भावेने हवाई सुंदरी म्हणून काम केले आहे.
-
प्यार की ये एक कहानी, बडे अच्छे लगते हैं, या हिंदी मालिकांमध्येही अभिज्ञाने छोटीशी भूमिका साकारली होती.
-
तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांनी 'तेजाज्ञा' या फॅशन ब्रँडची सुरुवात केली. 'तेजाज्ञा' फॅशन ब्रँन्ड द्वारे नाविन्यपूर्ण कलेक्शन्स आणत असतात.
-
अभिज्ञाच्या म्हणण्यानुसार तिला सुरुवातील न आवडणा-या, त्यांचा प्रचंड राग येणा-या व्यक्तीच पुढे जाऊन तिच्या जवळच्या बनल्या.
-
आपल्या सर्वांनाच अगदी सहज एखाद्या व्यक्तीवर क्रश होत असतं. पण एखाद्याच्या ज्ञानाच्या प्रेमात पडणं ही खूप वेगळी गोष्ट असते असे अभिज्ञा सांगते.
-
कॉमेडी करणं हे खूपच आव्हानात्मक आहे कारण मुळात तुमच्या अंगात ते असावं लागतं असं अभिज्ञा सांगते.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”