झी मराठीवर प्रदर्शित होणारी मालिका मिसेस मुख्यमंत्री अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. (सर्व फोटो – अमृता धोंगडे इन्स्टाग्राम) मालिकेतील सुमीचं पात्र लोकांना प्रचंड आवडलं आहे. सुमीचा रोखठोक स्वभाव आणि बिनधास्तपण प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे हिने मालिकेत सुमीची भूमिका निभावली आहे. मिसेस मुख्यमंत्री अमृता धोंगडेची पहिलीच मालिका आहे. मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. याआधी तिने मिथुन या मराठी चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटातून तिला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली. चित्रपटात तिने कांचीची भूमिका निभावली. कमी वेळात अमृता धोंगडेचं नाव मराठी प्रेक्षकांच्या घरात पोहोचलं आहे. अमृताचं पूर्ण नाव अमृता माणिकराव धोंगडे आहे. अमृताची जन्मतारीख ११ ऑक्टोबर १९९७ आहे. तिचा जन्म कोल्हापुरात झाला. रणवीर सिंग हा अमृताचा आवडता अभिनेता आहे. पुण्यातील सदाशिव पेठ येथील रेणुका स्कूल गर्ल्स हायस्कूलमधून तिने प्राथमिक शिक्षण घेतलं आहे. भारती विद्यापीठमधून तिने बीएससीचं शिक्षण घेतलं आहे. -
अमृताच्या वडिलांचा अभिनेय क्षेत्रात येण्यास विरोध होता. पण तिच्या आईने पाठिंबा दिला.
-
आईच्या पाठिंब्यामुळे आज ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारुपाला येत आहे.
अमृता आपल्या बहिणीला फॉलो करते. आपली बहिणी एकदम आपल्या विरुद्ध असून ती प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्लॅन करते असं ती सांगते. अमृताची डॉक्टर होण्याची इच्छा होती. अभिनेत्री नसतो तर आपण डॉक्टर झालो असतो असं ती सांगते. या फोटोंमध्येही अमृताचं सौंदर्य तितकंच खुलून दिसतं. अमृताने अभिनय क्षेत्रात येण्याचं ठरलं नव्हतं. पण मित्रांनी सांगितल्याने तिने ऑडिशन दिली आणि चित्रपटासाठी निवड झाली. अमृताला डान्सची आवड आहे. तिने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. याचा फायदा तिला अभिनयात झाला. पण मालिकेत दाखवली आहे अगदी त्याच्या उलट अमृता धोंगडेचं राहणीमान आहे. मालिकेत बिनधास्त दाखवलेली अमृता धोंगडे खऱ्या आयुष्यातही तितकीच बिनधास्त आणि मनमोकळी आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते. या फोटोंमधून तिचा ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाज पहायला मिळतो. मालिकेत नेहमी साडीत दिसणारी अमृता धोंगडे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. माधुरी दिक्षित ही अमृताची रोल मॉडेल आहे. तर प्रिया बापट ही तिची आवडती अभिनेत्री आहे.

Manoj Jarange Patil Statement: “फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया