छोट्या पडद्यावर खलनायिकेच्या भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री काम्या पंजाबी लवकरच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. येत्या १० फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार असून नुकताच तिचा साखरपुडा पार पडला. प्रियकर शलभ डांगसोबत काम्याचा साखरपुडा पार पडला. शलभ दिल्ली स्थित असून त्याला एक १० वर्षांचा मुलगा आहे. तर काम्याला ९ वर्षांची मुलगी आहे. काम्याने २००३ मध्ये व्यावसायिक बंटी नेगी याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. २०१३ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ‘बिग बॉस’, ‘क्यु होता है प्यार’, ‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘कहता हैं दिल’ अशा विविध मालिकांमुळे काम्या लोकप्रिय झाली. -
गेल्या वर्षापासून काम्या आणि शलभ डेट करू लागले होते.
-
थेरपीसाठी काम्याने शलभशी पहिल्यांदा संपर्क साधला होता. शलभचा आरोग्याच्या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आहे.
-
काम्याने 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.
-
'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात काम्याने हजेरी लावली होती.
-
छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/काम्या पंजाबी
-
छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/काम्या पंजाबी

“आम्ही मारवाडी आहोत, मराठीत का बोलू?”, पुणेरी ग्राहकानं दुकानदाराला दाखवला मराठी हिसका, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?