आनंद चित्रपटातलं बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये,लंबी नहीं राजेश खन्ना यांचा डायलॉग साऱ्यांनाच ठावूक असेल. या वाक्याला साजेसं उदाहरण ठरलं ते अभिनेत्री जिया खानचं. ऐन तारुण्यात जगाचा निरोप घेणाऱ्या जिया खानचा आज ३२ वा जन्मदिन आहे. अभिनेत्री जिया खानला आपल्या छोट्या करियरमध्ये यश, नावलौकिक आणि चाहत्यांचं प्रेम मिळालं. पण तिच्या मनात एका गोष्टीची कायम सल होती त्यामुळेच वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी तिने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. अवघ्या २५ व्या वर्षी बॉलिवूडमधील उभरत्या कलाकाराने जगाचा निरोप घेतला. जाणून घेऊयात जिया खान बद्दल… ३ जून २०१३ मध्ये जिया खानने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. जिया खानच्या आत्महत्येनंतर घरात सहा पानी पत्र मिळालं होतं.या पत्राचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. जिया खानची आई राबिया खान यांनी अपल्या मुलीच्या मृत्यूला सूरज पांचोलीला दोषी मानलं होतं. सात वर्षानंतरही जिया खानच्या मृत्यूचं गुढं उलगढलेलं नाही. २० फेब्रुवारी १९८८ रोजी न्यूयॉर्कमध्ये जिया खानचा जन्म झाला होता. जियाचं मूळ नाव नफीसा रिझवी खान होतं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. जिया खानने अभिनयासोबत ओपरा सिंगिंगचंही प्रशिक्षण घेतलंय. वयाच्या १६ व्या वर्षी तिने सहा पॉप ट्रॅक्सही दिले होते. जिया खान जॅज, सालसा, साम्बा, कथक आणि बेली डान्समध्ये पारांगत होती. जिया खानची आई राबिया अमीन बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयाचा वारसा जिला घरातूनच मिळाला होता. २००७ मध्ये जिया खानने राम गोपाल वर्मा यांच्या 'निशब्द' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. 'निशब्द' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका होती. पहिल्याच चित्रपटात सुपरस्टार अमिताभसोबत काम केल्यामुळे जियासाठी हा चित्रपट खास होता. पहिल्याच चित्रपटातील जियाच्या अभिनायची जोरगार चर्चा झाली होती. फिल्मफेअरमध्ये जियाला बेस्ट डेब्यू फिल्मसाठी नॉमिनेट केलं होतं. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यानंतर जिया खानने अमिर खानसोबत गजनी चित्रपटात काम केलं. यावरून तिचं अभिनय कौशल्य दिसून येतं. जिया खानने शाहरुख खानच्या 'दिल से' सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं होतं.

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’