सतत नव्या चेहऱ्यांच्या आणि गुणवत्तेच्या शोधात असणाऱ्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीत यश मिळवणे, आपले अस्तित्व टिकवून ठेवणे आणि त्याच वेळी कलाकार म्हणून आत्मिक समाधान मिळेल, असे काम करणे हे जरासे अवघड गणित आहे. कुठलीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या बळावर या क्षेत्रात पाय रोवणाऱ्या युवा अभिनेत्री म्हणून ईशा केसकर यांनी यशाचे हे अवघड गणित सोडवले आहे. रंगमंच ते टीव्ही-चित्रपटांच्या माध्यमातून लोकांसमोर आलेली ईशा केसकरबद्दल जाणून घेणार आहोत… ‘झी मराठी’च्याच ‘जय मल्हार’ या मालिकेतून बानूच्या भूमिकेत लोकप्रिय ठरलेल्या ईशा केसकरने ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘वुई आर ऑन’सारख्या चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. ‘जय मल्हार’ मालिकेतील बानू या भूमिकेमुळे ईशा घराघरात पोहोचली. सध्या ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाची भूमिका साकारत आहे. सध्या तिच्या या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटातही ईशाची महत्त्वाची भूमिका होती. ईशा ठरवून अभिनय क्षेत्रात आलेली नाही. मानसशास्त्राचे पदवी शिक्षण सुरू असताना सहज म्हणून नाटकाकडे वळलेल्या ईशाने एकाक्षणी या क्षेत्रातच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पुरुषोत्तम करंडक, सवाई एकांकिका अशा स्पर्धामधून पुढे येत अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली. ईशाचा जन्म ११ नोव्हेंबर १९९१ मध्ये पुण्यात झाला. २०१३ मध्ये ईशाने ‘वि आर ऑन, होऊन जाऊ द्या’ चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. ईशा मस्तीखोर स्वभावामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ईशा सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ईशा केसकर बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. गेल्या दोन वर्षांपासून ईशा ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. ईशा आणि ऋषीची पहिली भेट ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर झाली. ईशा आणि ऋषी मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वांचे आवडते कपल असल्याचे देखील म्हटले जाते. रसिकाप्रमाणे ईशानेही शनायाची भूमिका तितक्याच प्रभावीपणे साकारली आहे. रसिका तिच्या पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्यामुळे तिने ‘शनाया’ हे पात्र आणि पर्यायी मालिका अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री रसिका सुनील हिने बरीच मेहनत घेत ‘शनाया’ हे पात्र घराघरात पोहोचवत या कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये शनया मालिकेत जितकी हॉट आणि ग्लॅमरस दिसते खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच ग्लॅमरस आहेत.

Ajit Pawar : पोलीस उपअधीक्षकाची आंदोलकाला फिल्मी स्टाईलने लाथ; जालन्यातील घटनेवर अजित पवार म्हणाले…