प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे, असं प्रेमाची महती सांगताना म्हटलं जातं. पण, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन जिवांना एकत्र राहताना अनेकदा समाजाच्या रोषाला सामोर जावं लागतं. जात धर्माच्या भिंती प्रेम करणाऱ्यांचे बळी घेतात. पण, सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी या भिंती जमीनदोस्त करून समाजासमोर नवा आदर्श उभा केला आहे. जाणून घेऊयात अशाच बॉलिवूड कलाकारांबद्दल ज्यांनी जात धर्मांची बंधने धुडकावत लग्न केली. शाहरूख खान – गौरी छिब्बर : बॉलिवूड किंग खानने अनेक रोमॅंटिक चित्रपटात काम केलेय. शाहरूखचं चित्रपट पाहून अनेक तरूण-तरूणींचा प्रेम करण्याचा अंदाज बदललाय. फक्त चित्रपटातच नव्हे तर रियल लाइफमध्येही शाहरूखची लव्हस्टोरी भन्नाट आहे. शाहरूखने ज्यावेळी गौरी छिब्बरशी लग्न केले तेव्हा अनेक तरूण-तरूणींचा तो आदर्श बनला. शाहरुख खान आणि गौरीचं लग्न सहजासहजी झालं नाही. चित्रपटाप्रमाणे अनेक अडचणी दोघांच्या आयुष्यात आल्या. दोघांच्या प्रेमापुढे अनेक अडचणी आल्या. पण ह्यांनी त्याची परवा न करता लग्न केलं. शाहरूख खानने गौरी सोबत १९९१ मध्ये लग्न केले. आजही दोघांचं प्रेम बहारतच आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर : सैफ आणि करीनानं जात धर्माकडे न पाहता आपल्या प्रेमावरील विश्वासापोटी लग्न केलं. सैफ आणि करीना एकमेंकाच्या धर्माचा आदर करतात. दोघांमध्ये चांगली केमेस्ट्री दिसून येते. पण तुम्हाला माहीत आहे का, सैफ अली खानशी लग्न करण्यासाठी करिनाला फार मेहनत घ्यावी लागली. करिनाने तिचे सैफसाठीचे प्रेम घरी सांगितल्यावर तिला प्रचंड प्रमाणात विरोध करण्यात आला. करिनाने अनेक पद्धतीने घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तिचे प्रयत्न फळाला येत नव्हते. म्हणून अखेरीस करिनाने घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्न करेन तर सैफशीच नाहीतर कुणाशीच नाही. जर तुम्ही माझं सैफसोबत लग्न करुन दिले नाही तर मी घरातून पळून जाईन, असे करिनाने आपल्या आई- वडिलांना ठामपणे सांगितले होते. शेवटी मुलीच्या हट्टापुढे घरच्यांना नमते घ्यावेच लागले. नाईलाजास्तव का होईना पण शेवटी आई- वडिलांनी करिना आणि सैफच्या लग्नाला होकार दिला आणि ते लग्नाच्या बेडीत अडकले. सोहा अली खान आणि कुणाल खेमू : सोहा आणि कुणालनेही समाजापुढे एक चांगल उदाहरण ठेवलं आहे. या लव्हबर्डनी सिद्ध केलं की प्रेमापेक्षा कोणताही मोठा धर्म नसतो. दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले आहे. संजय दत्त आणि मान्यता : संजय दत्तच्या पत्नीचं खरं नाव मान्यता नाही. खूप कमी लोकांना माहित आहे की मान्यताचं खरं नाव दिलनवाज शेख आहे. दोघांच्या वयात १९ वर्षांचं अंतर आहे. पण प्रेमात वयालाही बंधन नसते. अखेर दोघांन लग्न केलं. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा : बॉलिवूडमधील 'क्यूट कपल' म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. रितेश देशमुख महाराष्ट्रीयन हिंदू तर जेनेलिया डिसूजा कॅथलिक. दोघांनीही जोडीदाराच्या धर्माचा आदर करत लग्न केलं. रितेश-जेनेलियाचं लग्न हिंदू आणि ईसाई पद्धतीनं झालं. आमिर खान आणि किरन राव आमिर खान आणि किरन राव दोघांची जोडी अतिशय भन्नाट दिसते. किरन आमिर खानची दुसरी पत्नी आहे. रीना दत्तसोबत घटस्फोट झाल्यानंतर आमिर खानने किरन रावशी लग्न केलं.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा