-
अजय देवगण हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्याच्या शांत स्वभावासाठी विशेष ओळखला जातो. अजयने आता पर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याने प्रत्येक चित्रपटासाठी चांगले मानधन देखील घेतले आहे. पण अजयकडे अनेक आलिशान गाड्या आणि जेट आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला पाहुया अजयचा आलिशान थाट..
-
अजयकडे एक रॉल्स रॉयस कार आहे. या कारची किंमत सात कोटी रुपये आहे. 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी तो या कारने आला असल्याचे म्हटले जाते.
-
अजयने २००६मध्ये maserati Quattroporte ही गाडी खरेदी केली होती. तेव्हा ही गाडी खरेदी करणारा पहिला भारतीय व्यक्ती अजय होता. या गाडीची किंमत जवळपास २.८ कोटी रुपये आहे.
-
अजय बॉलिवूडमधल्या निवडक अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याच्याकडे प्राइव्हेट जेट आहे. त्याच्याकडील हॉकर ८०० जेटची किंमत तब्बल ८४ कोटी रुपये आहे. पण आता हे जेट अजयने विकले असल्याचे म्हटले जाते.
-
अजय कडे ऑडी ए ५ ही स्पोर्ट्स कार देखील आहे
-
सध्याची रेंजरोवर वोग गाडी देखील अजयकडे आहे. या गाडीची किंमत २.७ कोटी आहे.
-
इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणे अजयकडे १.५ कोटी रुपयांची मर्सिडीज बेंज एस क्लास कार आहे.
-
तसेच अजयकडे BMW Z4 ही जवळपास १ कोटीची गाडी आहे. ही गाडी तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
-
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ त्याच्या करिअरमधील १००वा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
-
त्याने १९९१ मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
-
त्यानंतर त्याने १९९९ मध्ये अभिनेत्री काजोलसोबत लग्न केले.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा