करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाउनमुळे सर्व शूटिंग बंद असल्याने सर्व कलाकार घरीच बसले आहेत. मात्र सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या संपर्कात आहे. अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. सनीच्या या 'समर फोटोशूट'वर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सनीने बिकिनीतले फोटो पोस्ट केले असून तिच्या मादक अदांनी नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. यासोबतच तिने काही तिच्या जुन्या फोटोशूटचेही फोटो पोस्ट केले आहेत. पती डॅनिअल व तिच्या मुलांसह सनीसुद्धा घरीच आहे. घरी बसून ती काय करतेय, याचे फोटो व व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम, सनी लिओनी

अखेर ३ महिन्यांनी पैसाच पैसा! राजयोगामुळे ‘या’ राशींच्या नशिबात फक्त प्रमोशन, पगारवाढच नाही तर…