-
सध्या करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच बॉलिवूडमधील चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अभिनेता आयुषमान खुरानासोबत काम करणारे अभिनेते सोलंकी दिवाकर यांच्यावर देखील कठिण परिस्थिती ओढावली आहे.
-
सोलंकी दिवाकर सध्या दिल्लीमध्ये आहेत. पैशाची कमतरता भासत असल्यामुळे ते रस्त्यावर फळे विकून घर चालवत असल्याचे दिसत आहे.
-
सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
-
काही दिवसांपूर्वी त्यांनी आयुषमानच्या 'ड्रिम गर्ल' या चित्रपटात भूमिका साकरली होती.
-
त्यांनी या व्यतिरिक्त तितली आणि सोन चिरैया या चित्रपटात काम केले आहे.
-
पण आता लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी रस्त्यावर फळे विकण्यास सुरुवात केली आहे.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…