-
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. धनश्री वर्मा या यू-ट्युबरशी चहलचा आज साखरपुडा पार पडला. दोन्ही घरच्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने रोका समारंभ पार पडला.
-
धनश्री वर्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सोहळ्याची माहिती दिली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
-
“We said ‘Yes’ along with our families.” अशी कॅप्शन टाकत नंतर चहलनेही सर्वांना आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल माहिती दिली. (फोटो सौजन्य – धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
या बातमीनंतर साहजिकच चहलची होणारी बायको धनश्री आहे तरी कोण असा अनेकांना प्रश्न पडला असेल…चला तर जाणून घेऊयात तिच्याबद्दल काही खास गोष्टी
-
धनश्री ही डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून काम करते. धनश्रीची स्वतःची डान्स कंपनी आहे.
-
याव्यतिरीक्त धनश्रीचं स्वतःचं यू-ट्यूब चॅनल आहे. 1.5 million subscribers सबस्क्राईबर्स असलेली धनश्री ही बॉलिवूड डान्स नंबर आणि हिप हॉप गाण्यांवरही नाचते.
-
डान्सव्यतिरीक्त धनश्रीला फिरायला आवडतं तसंच कुत्र्यांसोबत खेळायलाही तिला आवडतं.
-
धनश्रीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गेल्यानंतर तिला फिरायची किती आवड आहे याचा अंदाज येतो.
-
धनश्री आपल्या आईच्या अत्यंत जवळची आहे. mumma’s girl म्हणवून घ्यायला तिला आवडतं.
-
धनश्री आपल्या आई समवेत
-
धनश्री आपल्या घरात Causal लूकमध्ये
-
धनश्रीने ही बातमी सांगितल्यानंतर सर्व स्तरातून चहल आणि धनश्रीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
-
(फोटो सौजन्य – धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
(फोटो सौजन्य – धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
(फोटो सौजन्य – धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…