-
कानपूर चकमकीत आठ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आणि पोलीस चकमकीत ठार झालेल्या गँगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर लवकरच वेब सीरिज येणार आहे. (फोटो इंडियन एक्स्प्रेस))
-
प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता या वेब सीरीजचं दिग्दर्शन करणार आहेत. निर्माता शैलेश आर. सिंग यांच्या कर्मा मीडिया आणि एंटरटेनमेंटने पोलॉरॉईड मीडियाच्या सहकार्यानं या वेब सीरिजचे हक्क विकत घेतले आहेत.
-
गावातील एका व्यक्तीनं नाव सांगण्याच्या अटीवर सांगितलं,"आजही त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकायला येतो. हे सगळ्यांना माहिती आहे, पण कुणीही बोलत नाही. काही लोकांनी तर विकास भैय्याला बघितलं सुद्धा आहे," अशी माहिती त्यानं दिली.
-
गावात ही चर्चा जोरदार रंगली असून, ग्रामस्थांमध्ये मात्र, भीतीचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे सूर्य मावळतीकडे झुकताच ग्रामस्थ आपापल्या घरात जाऊन बसत आहे. (फोटो सौजन्य -एएनआय))
-
गावातील आणखी एका महिलेनं सांगितलं की, 'गावातील लोकांकडून ऐकलं आहे. विकास दुबे जिवंत असताना घरातून जसे आवाज यायचे त्यासारखाच आवाज आणि हसू लोकांना ऐकू येत,' असं महिलेनं म्हटलं आहे.
-
विकास दुबेला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती. त्याला कानपूरला घेऊन जात असतानाच पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. त्यानंतर विकास दुबेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबेनं पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून गोळीबार केला. या चकमकीत विकास दुबे ठार झाला होता.
-
आयएएनएस' वृत्त संस्थेनं ग्रामस्थांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. कानपूर चकमकीत आठ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आणि पोलीस चकमकीत ठार झालेल्या विकास दुबेचं भूत दिसत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जात आहे.
-
सरकारनं बुलडोजरच्या साहाय्यानं विकास दुबेचं घर जमीनदोस्त केलं होतं. याचं पडक्या घराच्या अवशेषावर त्याचं भूत दिसत असून, गोळीबाराचा आवाजही ऐकू येतो, असं विकास दुबेच्या पडलेल्या घराजवळ राहणाऱ्या कुटुंबाचं म्हणणं आहे.
-
उत्तर प्रदेशातील कानपूर चकमकीतील प्रमुख आरोपी विकास दुबेचं नाव वेगळ्याचं गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. पोलीस चकमकीत ठार झालेल्या विकास दुबेचं भूत दिसत असल्याचा अजब दावा बिकरू गावातील ग्रामस्थांनी केला आहे. (सर्व फोटो संग्रहित))
-
या वेब सीरिजसाठी अजून कलाकारांची निवड झालेली नाही. विकास दुबेवर येणाऱ्या सिनेमामध्ये मनोज वाजपेयी प्रमुख भूमिका करणार असल्याचं व्हायरल झालं होतं. मात्र, ते वृत्त स्वतः मनोज वाजपेयीनेच फेटाळून लावलं होतं. त्यामुळे या वेब सीरिजमध्ये विकास दुबेच्या भूमिकेत कोण दिसणार हे औत्सुक्याचं असणार आहे.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ