-
संगीतकार यशराज मुखाते याने चक्क मालिकेतीन संभाषणावर एक रॅप साँग तयार केलं. या गाण्यामुळे रातोरात त्याला प्रसिद्धी मिळाली. अनेक मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटीही त्याची स्तुती करत आहेत. या फोटो गॅलरीत आपण एका व्हिडीओ किंवा फोटोमुळे प्रसिद्ध झालेले कलाकार पाहणार आहोत.
-
अरशद खान – हा व्यक्ती पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे चहा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
विकायचा. एका मॅगझिनच्या फोटोग्राफरने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या फोटोमुळे तो रातोरात प्रसिद्ध झाला. आता तो पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध मॉडेल आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कुसुम श्रेष्ठा – कुसुन भाजी विकण्याचं काम करायची. फोटोग्राफर रूपचंद्र महाजन यांनी तिचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या फोटोमुळे तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. सध्या ती काश्मिरमध्ये मॉडलिंग करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सायमा मीर – सायरा पुण्यातील सिंबायोसिस विद्यापीठात शिकणारी एक विद्यार्थीनी आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शाहरुख खानसोबत काढलेल्या एका ग्रुप सेल्फीमुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली. सध्या ती मॉडलिंग करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
संजीव श्रीवास्तव – यांना डान्सिंग अंकल असं म्हटलं जातं. एका लग्नात त्यांनी गोविंदाच्या गाण्यावर डान्स केला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या डान्सच्या व्हिडीओमुळे ते रातोरात प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी अनेक रिअॅलिटी शोंमध्ये डान्स केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ढिंचॅक पूजा – ढिंचॅक पूजा एक रॅपर आहे. सेल्फी मैंने ले ली आज या गाण्यामुळे ती प्रसिद्ध झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या गाण्यामुळे तिला बिग बॉस या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या ती भारतातील एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
प्रिया प्रकाश वारियर – प्रिया एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'ओरु अदार लव्ह' या चित्रपटातील तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या एका व्हिडीओमुळे तिला नॅशनल क्रश म्हटलं गेलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रानू मंडल – रानू मंडल रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन आपलं पोट भरायच्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गायक हिमेश रेशमीया याने त्यांना आपल्या चित्रपटात गाणं गाण्याची संधी दिली त्यामुळे त्या रातोरात स्टार झाल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यशराज मुखाते – यशराजने साथ निभागा साथियाँ या मालिकेतील एका सीनवर रॅप साँग तयार केलं. https://www.youtube.com/watch?v=SjhBeIz1tDI या लिंकवर क्लिल करुन तुम्ही हे गाणं पाहू शकता (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कोकिलाबेन नावाची एक सासू आपल्या सूनेला अर्थात गोपी बहुला जाब विचारत आहे. संभाषणादरम्यान या दोन व्यक्तिरेखा जे शब्द उच्चारतात त्यावर हे रॅप साँग तयार करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…