-
आपण बऱ्याच वेळा मालिकांमध्ये कलाकरांना वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहतो. पण पडद्यावर दिसणारी कलाकारांची नाती खऱ्याखुऱ्या आयुष्यात फार वेगळी असतात. अनेकदा पडद्यावर बहिण-भावाची भूमिका साकारणारे कलाकार ऑनस्क्रीन बहिणींच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले आहे. अशाच काही जोड्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत…
-
रोहन मेहरा आणि कांची सिंह यांनी 'ये रिश्ता क्या केहलाता है' या मालिकेत बहिण-भावाची भूमिका साकारली आहे.
-
पण रिअल लाइफमध्ये ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
-
'मेरे अंगने में' या मालिकेतील बहिण-भावीची जोडी म्हणजे अभिनेत्री चारु असोपा आणि नीरज मालवीय.
-
ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. तसेच ते लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. आता चारुने सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनशी लग्न केले आहे.
-
'तू सूरज मैं सांझ पियाजी' मालिकेत मयंक अरोरा आणि रिया शर्माने बहिण-भावाची भूमिका साकारली होती.
-
हे दोघे खऱ्याखुऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.
-
'एक वीर की अरदास- वीरा' या मालिकेत शिविन नारंग आणि दिगांगना सूर्यवंशी यांनी बहिण भावाची भूमिका साकारली होती.
-
त्यावेळी ते रिलेशनमध्ये असल्याचे म्हटले जात होते. आता त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
अमन वर्मा आणि वंदना लालवानी यांनी 'शपथ' या मालिकेत बहिण-भावाची भूमिका साकारली होती. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात ते एकमेकांना डेट करत होते. अमन आणि वंदनाने २०१६मध्ये लग्न केले आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल