चित्रपटसृष्टीत आपलं करिअर घडवू इच्छिणाऱ्या अनेक नवोदीत अभिनेत्रींना अनेक बरे वाईट अनुभव येत असतात. मराठी सिनेविश्वातला प्रसिद्ध चेहरा श्रुती मराठेलाही असाच अनुभव आला होता. "एका निर्मात्यानं मला वन नाइट स्टँडसाठी विचारलं. अभिनेत्री व्हायचं असेल तर या तडजोडी कराव्या लागतात असं त्यानं मला सांगितलं. मात्र मी त्याला सडेतोड उत्तर देत चित्रपटातून बाहेर पडली", असं श्रुती म्हणाली. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीनं तिच्या उमेदीच्या काळात आलेले अनेक बरे वाईट अनुभव शेअर केले. "जर अभिनेत्री होण्यासाठी मला अशी गोष्ट करावी लागणार असेल तर हिरो होण्यासाठी तुम्ही कलाकाराला काय करायला सांगता?" असा रोखठोक सवाल श्रुतीने त्या निर्मात्याला विचारला होता. श्रुतीच्या सवालानं तो निर्माताही स्तब्ध झाला होता. "मी त्याच्या वाईट हेतूबद्दल इतरांना सांगितलं तेव्हा माझ्या हितचिंतकांनी मला त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. एका मिनिटात घेतलेल्या त्या निर्णयानं मला धाडसी बनवलं", असं श्रुती म्हणाली. मराठी मनोरंजन विश्वात काम करण्याबरोबच श्रुतीनं दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे. श्रुतीची रुपेरी पडद्यावरील मालिका गाजल्यानंतर एका दाक्षिणात्य चित्रपटातील तिचा बिकिनीचा फोटो व्हायरल झाला होता. लोकांनी या फोटोवरून श्रुतीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. श्रुतीनं तो अनुभवही या मुलखातीत सांगितला, "मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळत होती. मी क्षणाचाही विलंब न करता बिकिनी घालायला तयार झाली. मी कोणतेही प्रश्न तेव्हा विचारले नाहीत. मात्र नंतर याच फोटोवरून माझ्यावर टीका झाली." अशा प्रसंगामुळे तुम्ही मेहनतीनं कमावलेली प्रतिष्ठा मातीमोल होते असंही ती म्हणाली. श्रुती मराठे आगामी 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. प्रवीण तरडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. श्रुतीने तामिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये श्रुती प्रकाश म्हणून तिची ओळख आहे. सोशल मीडियावर तिच्या फॅन फॉलोईंगची संख्या मोठी आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, श्रुती मराठे)

चाळिशीनंतर रात्रीचे जेवण टाळावे का? दिवसातून एकदा जेवणे अन् रात्रीचा उपवास करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…..