-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत टप्पू सेनाची नेहमीच प्रशंसा होताना दिसते. तसेच टप्पूचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्यांना लोकांचे भरभरुन प्रेम देखील मिळते. मालिकेतील इतर पात्र देखील सतत चर्चेत असतात. त्या मधील एक म्हणजे गोगी.
-
मालिकेत गोगी हे पात्र अभिनेता समय शाहने साकारले आहे.
-
समयला त्याचे कुटुंबीय तसेच इतर अनेक लोकं आता गोगी या नावाने आवज देतात.
-
पण तुम्हाला माहित आहे का समयचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अतिशय खडतर होता.
-
आज वयाच्या १९व्या वर्षी त्याने मेहनतीने सर्वकाही मिळवले आहे.
-
पण सुरुवातीला समय ज्यावेळी मुंबईमध्ये आला तेव्हा त्याला जमिनीवर झोपावे लागले होते असे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
-
अनेक दिवस त्याला झोप देखील आली नाही.
-
मुंबईमध्ये आल्यावर तो सुरुवातीचे काही दिवस कामाच्या शोधात होता.
-
२००८मध्ये त्याला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत भूमिका मिळाली.
-
या मालिकेतून त्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.
-
"मी मालिकेत काम करत आहे हे माझ्या मित्रांना देखील माहिती नव्हते" असे समयने म्हटले होते.
-
आज समयचे मुंबईमध्ये आलिशान घर आहे.
-
त्याच्या घराची किंमत जवळपास १.४८ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
तो मालिकेतील एका एपिसोडसाठी जवळपास ८ हजार रुपये घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
तसेच समय सध्या लोकप्रिय कलाकारांपैकी असल्याचे पाहायला मिळते.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल