-
अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेत्री मृणाल ठाकुर हिने उडी घेतली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"स्टार किड्सला माध्यमांनीच मोठं केलं, यामध्ये त्यांची काही चूकी नाही", असं प्रत्युत्तर तिने टीकाकारांना दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पिकंविलाला दिलेल्या मुलाखतीत मृणालने बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादावर प्रतिक्रिया दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती म्हणाली, "मनोरंजनसृष्टीत काम करणारा प्रत्येक कलाकार आपापल्या परीने मेहनत करत असतो. परंतु अनेक माध्यम नवोदित कलाकारांच्या कामाची स्तुती करत नाही. कार्यक्रमांमध्ये आंम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. कारण माध्यमांना स्टार किड्सचं जास्त आकर्षण जास्त असतं. स्टार किड्सला माध्यमच प्रसिद्ध करतात आणि मग त्यांच्या नावाने टीका करतात." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मृणालने या मुलाखतीत एक चकित करणारा अनुभव सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती एका चित्रपटाचं प्रमोशन करत होती. या चित्रपटात एक स्टार किड देखील होता. त्यावेळी माध्यमांनी तिला एकही प्रश्न न विचारला सर्व प्रश्न केवळ त्या स्टार किड्सलाच विचारले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारत असुनही माध्यमांनी तिला कुठलाच प्रश्न विचारला नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर ती म्हणतेय की माध्यमच स्टार किड्सला मोठं करतात. त्यामध्ये त्या कलाकारांची काहीही चूकी नसते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मृणालने २०१२ मध्ये 'मुझसे कुछ कहती ये खामोशियाँ' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर अर्जुन, कुमकुम भाग्य, बॉक्स क्रिकेट लीग, नच बलिये यांसारख्या काही टीव्ही शोमध्ये ती झळकली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
याचदरम्यान तिला विटी दांडू या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हृतिक रोशनच्या सुपर ३० या चित्रपटामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री मृणाल ठाकुर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री मृणाल ठाकुर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?