बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ४५ व्या वर्षात सुष्मिताच्या सौंदर्य आणखीनच खुललं आहे. तिचं सौंदर्य पाहून अनेकजण 'सैराट' होतील… दोन मुलींची आई असलेल्या सुष्मिताने आतापर्यंत लग्न केलेले नाही. पण सुष्मिता सध्या मॉडेल रोहमन शॉलला डेट करत आहे. सुष्मिताच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रोहमनसोबतचे बरेच फोटो पाहायला मिळतात. सुष्मिताच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही रोहमन सहभागी होतो. सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे. यापूर्वी सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती, मात्र सुष्मिता रितिकचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. रितिक बरोबरच सुष्मिताचं नाव रणदीप हुडा सोबतही जोडलं गेलं. मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. सुष्मिता सेनने १९९४ मध्ये ‘मिस यूनिव्हर्स’चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. सुष्मिताने वयाच्या २५व्या वर्षी आपली पहिली मुलगी रिनी हिला दत्तक घेतले. तिच्या या निर्णयाने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला होता. सुष्मिताने १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील ‘सिर्फ तुम’, ‘बीवी नंबर १’, ‘ऑंखे’, ‘मैं हूना’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सुष्मिताचा ‘बीवी नंबर वन’ हा सिनेमा फार गाजला होता. या सिनेमासाठी सुष्मिताला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. सुष्मिताने हिंदीसह तामिळ आणि बंगाली चित्रपटात देखील काम केले आहे. सुष्मिताला कविता खूप आवडतात. ती स्वतःही कविता करते. सुष्मिताने हिंदी माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण केले आणि तिने वयाच्या १६ व्या वर्षी इंग्रजी शिकायला सुरुवात केली होती. सुष्मिताला अॅडिसन (Addison’s disease) हा आजार होता. दृढ इच्छाशक्ती आणि वर्कआऊट सेशन्समुळे चार वर्षानंतर यावर मात केली. -
सुष्मिता इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टीव्ह झाली असून तिच्या आयुष्यातील, दैनंदिन जीवनातील बऱ्याचशा घटना ती चाहत्यांसोबत शेअर करते.
-
सर्व फोटो सुष्मिता सेन हिच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल