-
सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी. अंबानी कुटुंबीय हे त्यांच्या शाही लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. पण आता सोशल मीडियावर निता अंबानी अभिनेत्री कंगना रणौतला तिच्या नव्या स्टुडिओच्या उभारणीसाठी २०० कोटी रुपयांची मदत करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण निता अंबानी खरच कंगनाला मदत करणार आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय आहे सत्य…
-
काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रणौतला बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती.
-
या नोटीसमध्ये सात मुद्दे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार इमारतीचे बांधकाम पालिकेच्या नियमांनुसार न झाल्याचे सांगण्यात आले होते.
-
महापालिकेने कंगनाला नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.
-
कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडले.
-
त्यानंतर काहींनी कंगना पाठिंबा तर काहींनी पालिकेने योग्य केल्याचे म्हटले.
-
दरम्यान कंगनाला नवे ऑफिस उभारणीसाठी मुकेश अंबानी यांची पत्नी निता अंबानी मदत करणार असल्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या.
-
सोशल मीडियावर निता अंबीना कंगाना २०० कोटींची मदत करणार असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या
-
पण 'जनसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार अंबानी कुटुंबीय अशी कोणतीही मदत कंगनाला करणार नसल्याचे समोर आले आहे.
-
तसेच कंगनाने देखील त्यांच्याकडे मदत मागितलेली नसल्याचे वृत्तामध्ये नमूद केले आहे.
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”