-
'पवित्र रिश्ता' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आशा नेगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ऑनलाईन पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या सपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच तिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. मात्र हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या फोटोमुळे तिला काही जणांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे आशाने देखील आपल्या अनोख्या शैलीत या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आशाने एका जुन्या घरासमोर उभं राहून फोटो काढला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या फोटोमध्ये तिने एका लाकडी खांबाला पकडलं आहे. तिचा हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"आता तू म्हातारी झाली आहेस, लवकर लग्न कर, तुझ्या पेक्षा ती मागची भिंत अधिक तरुण दिसतेय." अशा आशयाची पोस्ट लिहित तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ट्रोलर्सच्या या टीकेवर आशाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"मित्रांनो तुमच्या विनोदाला मी १०० गुण देते, पण तुमच्या विचारांचं काय करायचं? ही केस सायबर बुलिंगची देखील होऊ शकते." अशा आशयाची कॉमेंट करत तिने ट्रोलर्सला धमकीवजा इशारा दिला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आशाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आशा नेगी एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२०१० साली तिने 'सपनों से भरे नैना' या मालिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मालिकेत तिने 'मधुरा' ही व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिने 'हिटलर दिदी', 'कबूल है', 'पुनर विवाह', 'जमाई राजा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'पवित्र रिश्ता' आणि 'बडे अच्छे लगते है' या दोन मालिकांमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'बिग बॉस', 'बॉक्स क्रिकेट लीग', 'नच बलिये' यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये देखील ती झळकली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'लुडो' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिवाय अलिकडेच 'बारीश' या वेब सीरिजमध्ये देखील ती झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या सीरिजमध्ये तिने 'शर्मन जोशी'सोबत काम केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?