-
जगभरामध्ये आपल्या पॉप गाण्यांसाठी लोकप्रिय असणारी आणि बार्बाडोसला राहणारी गायिका रिहानाने आपल्या एका एक्स फॅण्टी लिंगरी शोमध्ये गायलेल्या गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. रिहानाने आता यासंदर्भात माफी मागितली आहे. लिंगरी शोमध्ये एका गाण्यात रिहानाने इस्लामिक हदीसमधील काही ओळींचा वापर केला. याचवरुन रिहानावर अनेकांनी टीका केली आणि तिला रोष ओढावून घ्यावा लागाला. (फोटो सौजन्य: एपी)
-
रिहानाने गायलेल्या गाण्यामध्ये इस्लाममध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या काही ओळींचा समावेश होता. या ओळी हदीस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पठणातील आहेत. रिहानाने माफी मागताना तिने वापरलेल्या ओळी या बेजबाबदारपणे वापरल्याची कबुली दिली. या ओळी मुद्दाम वापरण्यात आल्या नसल्या तरी झालेली गोष्टी ही बेजबाबदारपणाची असल्याचे रिहानाने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: सोशल मिडिया)
-
इस्लाममधील पवित्र ग्रथांचा संग्रह म्हणजे हदीस. पैगंबर मोहम्मद यांनी हदीसमधील शब्द उच्चारल्याचे मानले जाते. कुराणनंतर इस्लाममध्ये हदीस हा सर्वात महत्वाचा धर्मग्रंथ आहे. रिहानाने गाण्यामध्ये वापरलेल्या ओळी या हदीसमधील असून या ओळींमध्ये विनाशाचा दिवस जवळ येण्यासंदर्भातील भाष्य केलं आहे. (फोटो सौजन्य: facebook/rihanna वरुन साभार)
-
रिहानाचा सहकलाकार कुओको क्लो यानेही यासंदर्भात माफी मागितली आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
विविध संस्कृतींबद्दल रिहानाच्या भूमिकेचे तिचे चाहते अनेकदा स्वागत करतात. तिच्या फॅशन सेन्सचे तिच्या चाहत्यांना मोठं कौतुक आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
मात्र अॅमेझॉन प्राइमवर २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या रिहानाच्या कार्यक्रमाममधील गाण्यात वापरण्यात आलेल्या ओळींमुळे रिहानाने इस्लाम धर्मीय चाहत्यांचा रोष ओढावून घेतला आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
रिहानाच्या अनेक चाहत्यांनी उघडपणे यावर टीका केली असून अशाप्रकारे धार्मिक संदर्भ असणाऱ्या ओळींचा समावेश अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधील गाण्यामध्ये करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. (फोटो सौजन्य: facebook/rihanna वरुन साभार)
-
रिहानाने माफी मागितल्यानंतर तिच्या चाहत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तिच्या एका २६ वर्षीय चाहतीने मनोरंजन सृष्टीमध्ये मुस्लिमांनी अधिक संख्येने येणं गरजेचं आहे. असं झाल्यास अशा गोष्टींवर आळा घालता येईल असं मत व्यक्त केलं आहे. ही २६ वर्षीय चाहती एक ब्लॉगर आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
सौंदर्यासंदर्भातील ब्लॉगर म्हणून लोकप्रिय असणाऱ्या होधेनने मी हा व्हिडीओ पाहिल्यावर मला अस्वस्थ वाटू लागले. या ओळी हदीसमधील असून कोणीतरी नाचता नाचता या सादर केल्यात हे पाहून मला राग आला असल्याचे होधेनने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: facebook/rihanna वरुन साभार)
-
इस्लाम धर्म सर्वसमावेश आहे मात्र अशाप्रकारावर प्रत्येक मुस्लिमाला नाराज होण्याचा हक्क आहे असंही होधेनने म्हटलं आहे. आपण रिहानाच्या कार्यक्रमातील या प्रकारानंतर फॅण्टीचे प्रोडक्ट न घेण्याचा विचार करत असल्याचेही होधेनने नमूद केलं आहे. (फोटो सौजन्य: facebook/rihanna वरुन साभार)
-
रिहानाने अशाप्रकारे रोष ओढावून घेण्याची ही काही पहिलीच घटना नाहीय. (फोटो सौजन्य: facebook/rihanna वरुन साभार)
-
यापूर्वी २०१३ साली एका चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या फोटोमुळे रिहानाला आबुधाबीमधील मशीदीतून बाहेर जाण्यास सांगितलं होतं. (फोटो सौजन्य: एपी)

“गुजरातचे गृहमंत्री असताना तुम्हाला अटक झालेली”, काँग्रेस खासदाराने कोंडीत पकडताच अमित शाह म्हणाले…