-
ग्लॅमरच्या दुनियेत राहण्यासाठी आजकाल अनेक कलाकार वजन कमी करण्याच्या मागे असतात किंवा आहे ते वजन कायम ठेवण्याचा प्रयत्न करत राहतात. मग त्यासाठी जीममध्ये जातात, डायट करतात. कधी कधी तर कलाकार सर्जरीही करुन घेतात. पण या वजन कमी करण्याच्या हट्टामुळे कलाकारांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. चला जाणून घेऊया अशाच कलाकारांविषयी…
-
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे निधन झाले.
-
असे म्हटले जाते की वजन कमी करण्यासाठी घेत असलेल्या टायटमुळे मिष्टीचा मृत्यू झाला आहे.
-
'तारक महेता का उल्टा चष्मा' या मालिकेतील डॉ. हाथीची भूमिका साकारणारे कवि कुमार आझाद यांनी देखील वजन कमी करण्यासाठी सर्जरी केली होती.
-
त्यांचे वजन १५० किलो पेक्षा जास्त होते.
-
त्यांनी वजन कमी करण्यासाठी सर्जरी केली होती आणि ती यशस्वी देखील ठरली होती. पण नंतर त्यांना अनेक आजार सतावू लागले. २०१८मध्ये त्यांचे निधन झाले.
-
अभिनेत्री आरती अग्रवालने देखील वजन कमी करण्यासाठी सर्जरी केली होती.
-
पण सर्जरी केल्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे ती रुग्णालयात दाखल झाली. पण उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.
-
'रावडी राठोर' आणि 'दबल धमाल' या हीट चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते राकेश दीवाना यांनी देखील वजन कमी करण्यासाठी सर्जरी केली होती.
-
सर्जरी नंतर चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?