'रात्रीस खेळ चाले २' मधील या मालिकेतील शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. शेवंताच्या अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली होती. ही मालिका संपल्यापासून प्रेक्षक शेवंताला खूप मिस करत आहेत. पण शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत पुनरागमन करणार आहे. झी युवा वाहिनीवरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय'मध्ये अपूर्वा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या मालिकेत अपूर्वा पम्मी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. पम्मी या भूमिकेतून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झालीय. या मालिकेची शैली विनोदी असून पम्मी ही या मालिकेला ग्लॅमरचा तडका देणार आहे.

ऑगस्ट महिन्यात ‘या’ ३ राशींची सोनं अन् चांदी! पैशात वाढ, प्रत्येक क्षेत्रात यश अन् मनातील इच्छा होतील पूर्ण