-
प्रियांका चोप्रा ही एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडसोबतच तिने हॉलिवूड सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लवकरच ती मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्सच्या चित्रपटांमध्ये देखील झळकणार अशी चर्चा होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्वत: प्रियांकाने देखील 'मिस मार्व्हल' ही व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
विशेष म्हणजे या रोलसाठी तिने ऑडिशन देखील दिलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु अंतिमक्षणी निर्मात्यांनी प्रियांका ऐवजी अभिनेत्री इमान वेलानी हिची निवड केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कास्टिंग दिग्दर्शकांनी मिस मार्व्हल ही व्यक्तिरेखा इमान वेलानीच्या पदरात टाकली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मार्व्हलने आपल्या जुन्या सुपरहिरोंना अॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटातून निवृत्त केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आता ते नव्या कलाकारांमध्ये गुंतवणूक करत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे कॅप्टन अमेरिका, आर्यनमॅन, ब्लॅक विडो असे सुपरहिरो सोडून आता नवे सुपरहिरो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मिस मार्व्हल ही देखील या नव्या फळीतील सुपरहिरोंपैकी एक आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कॉमिक्स स्टोरीलाईननुसार या कॅरेक्टरचं खरं नाव कमला खान असं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पाकिस्तानमध्ये राहणारी ही तरुणी जगाला वाचवण्यासाठी अॅव्हेंजर्सच्या फौजेत दाखल होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्क्रिन रेंटने दिलेल्या वृत्तानुसार ही व्यक्तिरेखा प्रियांका चोप्राने साकारावी अशी इच्छा मार्व्हलचे सीईओ जो रुसो यांनी व्यक्त केली होती. प्रियांका देखील सुपरहिरोच्या भूमिकेत येण्यासाठी सज्ज होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने ऑडिशन देखील दिलं होतं. परंतु कास्टिंग दिग्दर्शकांना मात्र तिचं काम आवडलं नाही. शिवाय प्रियांका आता ३८ वर्षांची आहे. त्यांना एक तरुण अभिनेत्री हवी जी किमान पुढील १५ वर्ष ही व्यक्तिरेखा सोडणार नाही. त्यामुळे त्यांनी प्रियांका ऐवजी २० वर्षीय इमान वेलानीची निवड केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…