अभिनेत्री पूजा बेदी मुलगी अलाया फर्नीचरवालाने आतापर्यंत जरी एकाच चित्रपटात काम केलं असलं तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने ती सोशल मीडियावर चर्चेत असते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातू ऐश्वर्य ठाकरेनं नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. दुबईमध्ये पार पडलेल्या या बर्थ-डे सेलिब्रेशनला अलायानेसुद्धा हजेरी लावली होती. या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ ऐश्वर्य ठाकरेची आई व निर्मात्या स्मिता ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. स्मिता ठाकरेंनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत ऐश्वर्य एका रेस्टॉरंटमध्ये केक कापताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी अलायाचा उल्लेख केला आहे. तर ऐश्वर्यने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये आई स्मिता ठाकरे आणि अलाया या दोघींना टॅग केलं आहे. अलायाने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या प्रिमिअरला ऐश्वर्यने हजेरी लावली होती. अलायाने तिच्या २२व्या वाढदिवसाच्या पार्टीतील ऐश्वर्यसोबतचे फोटो पोस्ट केले होते. -
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, Alaya F

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या कानशिलात लगावणाऱ्या आरोपीचं नाव व फोटो समोर, हल्ल्याचं कारणही सांगितलं