-
करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्वर प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोणते चित्रपट प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चला जाणून घेऊया अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या काळात कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
-
'हलाल लव्ह स्टोरी' हा आगामी मल्याळम विनोदी चित्रपट आहे. झकरिया मोहम्मद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत इंद्रजित सुकुमारन, जोजू जॉर्ज, शराफ यू धीन, ग्रेस अॅन्टोनी व सौबीन शाहिरसह पार्वती थिरूवोथू आहे. हा चित्रपट १५ ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
-
'भीम' हा कार्तिक सरागुर यांचे दिग्दर्शन असलेला आगामी कन्नड कौटुंबिक मनोरंजनपूर्ण चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अरविंद अय्यर, आरोही नारायण, प्रियंका थिमेश, अच्युत कुमार व आद्या हे प्रमुख भूमिकेत आहेत. २९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
'सूरराई पोट्रू' हा सुधा कोंगारा यांचे दिग्दर्शन असलेला आगामी तमिळ भाषेतील अॅक्शन/ड्रामा चित्रपट आहे. सुरिया अभिनीत या चित्रपटामध्ये अपर्णा बालमुरली, परेश रावल व मोहन बाबू प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांच्या जीवनावर लिहिण्यात आलेले पुस्तक 'सिम्प्ली फ्लाय'ची काल्पनिक आवृत्ती आहे. ३० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
'छलांग' हा राजकुमार राव, नुशरत भरूचा अभिनीत आणि हंसल मेहता यांचे दिग्दर्शन असलेला प्रेरणादायी सामाजिक विनोदी चित्रपट आहे. भूषण कुमार प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते अजय देवगण, लव्ह रंजन व अंकुर गर्ग हे आहेत. १३ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
-
'माने नंबर १३' हा विवी कथिरेसन यांचे दिग्दर्शन असलेला आगामी हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. कृष्णा चैतन्यचे श्री स्वर्णलता प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटामध्ये वर्षा बोल्लम्मा, ऐश्वर्या गौडा, प्रवीन प्रेम, चेतन गंधर्व, रामना आणि संजीव हे कलाकार आहेत. १९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
आनंद देवराकोंडा व वर्षा बोल्लम्मा अभिनीत 'मिडल क्लास मेलोडीज' हा गावातील मध्यमवर्गी यांच्या जन्मजात जीवनांना दाखवणारा विनोदी चित्रपट आहे. एका तरूण पुरूषाचे शहरामध्ये हॉटेलचे मालक असण्याचे स्वप्न आहे. विनोद अनंतोजू हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. २० नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर
-
अशोक यांचे दिग्दर्शन आणि भूमी पेडणेकर अभिनीत 'दुर्गावती' हा रोमांचपूर्ण, भयावह प्रवास दाखवणारा चित्रपट आहे. हा चित्रपट एका निरागस सरकारी अधिका-याच्या कथेला सादर करतो, जो शक्तिशाली दलांनी केलेल्या कटकारस्थानाला बळी पडतो. ११ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर
-
'मारा' हा दिलीप कुमार यांचे दिग्दर्शन असलेला आगामी तमिळ भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे. प्रमोद फिल्म्सचे प्रतीक चक्रवर्ती व श्रुती नल्लाप्पा हे चित्रपटाचे निर्माते आहे. या चित्रपटामध्ये माधवन व श्रद्धा श्रीनाथ प्रमुख भूमिकेत आहेत. १७ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर
-
'कूली नं. १' हा कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोदी चित्रपटांचा राजा डेव्हिड धवन यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन, सारा अली खान, परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर, राजपाल यादव यांनी काम केले आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या कानशिलात लगावणाऱ्या आरोपीचं नाव व फोटो समोर, हल्ल्याचं कारणही सांगितलं