'अग्गंबाई सासूबाई' मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक आसावरी, अभिजीत, शुभ्रा आणि बबड्या या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत. या मालिकेतील कलाकारांवर येणारे मीम्स देखील व्हायरल होत आहेत. मालिकेत आतापर्यंत बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. सोहमचं वागणं, आसावरीचं त्याला पाठीशी घालणं, शुभ्राची घर सांभाळताना होणारी तारेवरची कसरत. पण आता सोहम आणि शुभ्राच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येत आहे. शुभ्रा आणि सोहम यांच्यातील वाद मिटून दोघांनी एकत्र यावं यासाठी दोघांचेही कुटुंबीय लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवत आहेत. आसावरी शुभ्राला मंगळसूत्र न घालण्यावरून पुन्हा प्रश्न विचारते. शेवटी शुभ्रा आसावरीसाठी ॲनिव्हर्सरीच्या सोहळ्यात सोहमच्या हातून मंगळसूत्र घालून घेण्याचा निर्णय घेते. कार्यक्रमासाठी घरी आलेल्या सर्व मंडळींना सोहम घराबाहेर जायला सांगतो आणि शुभ्राला मंगळसूत्र घालण्यासाठी बळजबरी करतो. हे जेव्हा आसावरीला कळेल तेव्हा त्या सोहमच्या बाजूने उभ्या राहणार की शुभ्राच्या हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मालिकेतला हा हाय वोल्टेज ड्रामा सोमवार ते रविवार रात्री आठ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

Maharashtra Heavy Rain Alert : मुंबईची लाईफलाइन कोलमडली; मध्य रेल्वे ठाण्यापर्यंतच, हार्बर रेल्वे कासवगतीने चालू