-
बॉलिवूड चित्रपटात किसिंग सीन आता सामान्य बाब झाली आहे. कथानकाच्या गरजेनुसार कलाकार किसिंग सीन देतात. ( सर्व फोटो सौजन्य – काजोल फेसबुक)
-
बॉलिवूडमध्ये नावाजलेल्या कलाकारांपैकी काही मोजके असे कलाकार आहेत, ज्यांनी ऑनस्क्रिन कधीही सहकलाकारासोबत किसिंग सीन केलेला नाही. यात सलमान खान आणि २०१६ पर्यंत अजय देवगणचेही नाव होते.
-
अजय देवगण आणि काजोल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शो च्या सेटवर आले होते.
-
तेव्हा कार्यक्रमाचा अँकर असलेल्या कपिलने काजोलला अजय देवगणच्या 'शिवाय' चित्रपटातील किसिंग सीनबद्दल प्रतिक्रिया विचारली.
-
काजोलही 'शिवाय' चित्रपटाची सह-निर्माती होती. 'मला या किसिंग सीनबद्दल काही सांगण्यात आले नव्हते' असे काजोलने उत्तर दिले.
-
"अजयने मला किसिंग सीनबद्दल काही सांगितले नव्हते. त्याने माझी नंतर माफी मागितली. मी असा सीन केला आहे, आता मी सॉरी बोलतो" असे काजोल म्हणाली.
-
त्या सीनमुळे तुमचा जळफळाट झाला का? या प्रश्नावर काजोल म्हणाली की, 'मला त्या सीनबद्दलच माहितच नव्हते. पण जेव्हा मी पाहिले, तेव्हा दिवाळीमधली बंदुक मी बाहेर काढली.' खेळीमेळीच्या वातावरणात हास्य-विनोदामध्ये काजोलने कपिलच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
-
'शिवाय' एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. अजयने या चित्रपटात एका गिर्यारोहकाची भूमिका साकारली होती, जो एका महिलेला मदत करतो.
-
बॉलिवूडमध्ये जोडया बनतात आणि तुटतात. पण फार कमी अशी प्रेम प्रकरणे असतात, जी विवाहापर्यंत पोहोचतात. अजय देवगण आणि काजोल यांच नातं सुद्धा असचं आहे.
-
अजय आणि काजोलच्या लग्नाला आता २१ वर्ष झाली. १९९९ साली दोघे विवाहबद्ध झाले. इतक्यावर्षात कधीही त्यांच्यात बेबनाव झाल्याचं समोर आलं नाही. बॉलिवूडमध्ये अजय-काजोलकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं.

Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”