बॉलिवूड कलाकार हे कायम त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि फॅशनसेन्समुळे चर्चेत असतात. अनेक कलाकार हे खासकरुन त्यांच्या महागड्या कपड्यांसाठी आणि अॅक्ससेरीजसाठी ओळखले जातात. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तूदेखील लाखो रुपयांच्या घरात असतात. मात्र, या सगळ्याला काही कलाकार हे अपवाद आहेत. विशेष म्हणजे लोकप्रियतेचं शिखर गाठणारे हे कालाकार अगदी लोकल मार्केटमधूनदेखील खरेदी करताना दिसतात. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगणारे हे कलाकार कोणते ते जाणून घेऊयात. सनी देओल- गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. कलाविश्वाप्रमाणेच राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावणारा सनी देओल आजही सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगतो. करोडो रुपयांची संपत्ती असतानादेखील सनीला साधे कपडे परिधान करणे जास्त आवडत असल्याचं दिसून येतं. लाइमलाइटपासून दूर असलेल्या सनीने अभिनयानंतर दिग्दर्शकीय क्षेत्रातही नशीब आजमावलं आहे. पल पल दिल के पास या चित्रपटाचं त्याने दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. इम्रान हाश्मी – बॉलिवूडमधील सिरीअल किसर या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे इम्रान हाश्मी. सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या कलाकारांमध्ये याच्या नावाचादेखील समावेश आहे. अनेकदा इम्रानला लोकल मार्कटमध्ये खरेदी करताना पाहण्यात आलं आहे. राजकुमार राव – उत्तम अभिनयशैली आणि दर्जेदार चित्रपटांची निवड यासाठी राजकुमार राव ओळखला जातो. सामान्य कुटुंबातून आलेला राजकुमार राव याचे विचार आजही साधे आहेत. -
यशाचं आणि प्रसिद्धीचं शिखर गाठलेला हा अभिनेता आजही ब्रॅण्डेड कपडे घालण्याचं
नवाजुद्दीन सिद्दीकी – सिक्रेड गेम्समुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. गेल्या काही दिवसापासून नवाज सतत चर्चेचा विषय ठरत आहे. एका लहानशा गावातून आलेला नवाज साधं राहणीमान यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे तो अत्यंत साध्या पद्धतीने राहताना दिसून येतो. सारा अली खान- केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक असल्यामुळे साराकडे कायमच प्रसारमाध्यमांचं लक्ष असतं. तसंच लहानपणापासून स्टारडम उपभोग असलेल्या साराला महागड्या कपड्यांचा शौक असेल असं अनेकांना वाटतं. परंतु, तसं अजिबात नाहीये. साराला अनेक वेळा मुंबईतील लोकल मार्केटमधून कपडे घेताना पाहण्यात आलं आहे. तसंच तिला आणि अमृता सिंग या दोघींना एकदा हैद्राबादमधील लोकल मार्केटमध्येही शॉपिंग करताना पाहण्यात आलं होतं. सारानेदेखील याविषयी एका मुलाखतीत सांगितलं होतं. अक्षय कुमार- बॉलिवूड खिलाडी अर्थात अक्षय कुमार याच्या अभिनयाविषयी किंवा संपत्तीविषयी काही वेगळं सांगायला नको. अक्षयच्या अनेक चित्रपटांनी१०० कोटींच्या घरात कमाई केली आहे. मात्र, तरीदेखील तो अत्यंत साध्या पद्धतीने राहतो. वायफळ पैसे खर्च करण्यापेक्षा तो देशसेवेसाठी किंवा गरजुंसाठी मदत करण्यावर अधिक भर देतो. तसंच तो शक्यतो पार्टी करणं किंवा बाहेरील पदार्थ खाणंदेखील टाळत असल्याचं सांगण्यात येत. काजोल – बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे काजोल. इश्क, तान्हाजी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. मात्र, आजही काजोल सामान्यांप्रमाणेच जीवन जगते. काजोल अनेकदा पार्टीमध्ये जाण्यास टाळते किंवा लाइमलाइटपासून दूर राहते. तसंच ती आजही लोकल मार्केटमध्ये खरेदी करताना दिसून येते.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग