-
अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी नुकतंच जुहूमध्ये एक बंगला भाड्याने घेतला आहे.
हा बंगला मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध व लोकप्रिय परिसरात असून त्यासाठी हे दोघं दर महिन्याला भरभक्कम भाडं देत आहेत. जुहू परिसरात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक मोठमोठे कलाकार राहतात. रिचा-अलीने पंधरा दिवसांपूर्वीच हा बंगला भाड्याने घेतला आहे. 'स्क्वेअरफिटइंडिया' या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ३० सप्टेंबर रोजी जुहूमधील Udadhi Tarand सोसायटीमध्ये बंगला नंबर ४ भाड्याने घेतला आहे. हा बंगला त्यांनी ३६ महिने म्हणजेच तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतला आहे. या बंगल्याचं भाडं पहिल्या वर्षासाठी ३ लाख रुपये प्रती महिना इतका आहे. तर दुसऱ्या वर्षी बंगल्याचं भाडं वाढून ३.१५ लाख रुपये प्रती महिना होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या वर्षी ३.३० लाख रुपये प्रती महिना भाडं त्यांना द्यावं लागणार आहे. अली फजलने १० लाख रुपयांचं डिपॉझिट दिलं आहे. -
अली फजल आणि रिचा चड्ढा लवकरच लग्न करणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख