-
झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेतील अपूर्वा नेमळेकर म्हणजेच शेवंता ही व्यक्तीरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. (सर्व फोटो – अपूर्वा नेमळेकर, इन्स्टाग्राम)
-
शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला होता.
-
अपूर्वाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय.
-
खणाची साडी, त्यावर पारंपरिक दागिने, नथ, डोक्यावर पदर, केसात माळलेला गजरा असा अपूर्वाचा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे.
-
अपूर्वाच्या या खास लूकसाठी मनिषा कोळगे यांनी मेकअप केलं आहे.
-
अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.
-
अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावरही अपूर्वाने इमिटेशन ज्वेलरी डिझाइनिंगचा स्वत:चा ब्रॅण्ड विकसित केला आहे.
-
व्यवसाय आणि अभिनय या दोन्हीची सांगड घालण्यात ती यशस्वी ठरली आहे.
-
अपूर्वाला स्वयंपाक करायलाही फार आवडतं. लॉकडाउनमधील तिने बराच वेळ नवनवीन पदार्थ बनवण्यात घालवला.
-
अभिनयाव्यतिरिक्त तिला पेंटिंग आणि स्केचेस करायलाही आवडतं.

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…