-
‘जेम्स बॉण्ड’ हा सिनेसृष्टीतील आजवरचा सर्वोत्कृष्ट डिटेक्टिव्ह म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
१९६२ साली तयार झालेली ही व्यक्तिरेखा आज ५८ वर्षानंतरही तितकीच लोकप्रिय आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु या लोकप्रियतेमागे सिंहाचा वाटा आहे तो चित्रपटात झळकणाऱ्या अभिनेत्रींचा. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जेम्स बॉण्डच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना नेहमीच सुंदर अभिनेत्री पाहायला मिळतात. या अभिनेत्रींना 'बॉण्ड गर्ल' म्हणून ओळखलं जातं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेल्या ५८ वर्षांत तिफिनी केस, कॅरोलीन मुनरो, एमिली बोल्टन, कॅसॅन्ड्रा हॅरिस, सेरेना गॉर्डन, हॅले बेरी यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी 'बॉण्ड गर्ल' ही भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यांपैकी अर्सुला अँड्रेस ही पहिली बॉण्ड गर्ल सध्या प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री अर्सुला अँड्रेस यांनी १९६२ साली 'डॉ. नो' या चित्रपटात बॉण्ड गर्लची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या बिकीनीचा लिलाव होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ऑक्शनिअर्स प्रोफाईल्स इन हिस्ट्रीने दिलेल्या वृत्तानुसार येत्या १२ आणि १३ नोव्हेंबरला हा लिलाव होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या बिकिनीची बेस प्राईज ६५ लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे यापूर्वी २००१ साली या बिकिनीचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी लंडनमधील एका संग्रहालयाने तब्बल ४५ लाख रुपये देऊन ही बिकिनी खरेदी केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आता १९ वर्षानंतर 'जेम्स बॉण्ड नो टाईम टू डाय' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या बिकिनीचा लिलाव केला जाणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जेम्स बॉण्ड चित्रपटांच्या इतिहासातील पहिली बिकिनी म्हणून या वस्त्राचे एक वेगळेच महत्व आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ब्रेन चेस या वेशभूषाकारानं या बिकिनीची निर्मिती केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आज तब्बल ५८ वर्षानंतरही अर्सुला अँड्रेस यांनी परिधान केलेली ही बिकिनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल