देश अनलॉक झाल्यानंतर मिलिंद सोमन आणि पत्नी अंकिता फॉरेन ट्रीपसाठी घराबाहेर निघाले आहेत. मिलिंद-अंकिता सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अमेरिकेत पोहचले आहेत. त्याचे काही रोमँटिक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमेरिकेतील समुद्राच्या किनाऱ्यावरील रोमँटिक फोटो त्यांनी शेअर केला आहे. ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमण सतत सोशल मीडियावर चर्चेत असतो. अंकितानेही मिलिंद सोमन यांच्यासोबत चक्रासन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. अंकिता आणि मिलिंद यांनी २०१८ मध्ये लग्न केले. मिलिंदने त्याचे नाते जगापासून न लपवता ते सर्वांसमोर खुलेपणाने मांडले. अनेकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्नही उपस्थित केले पण तरीही मिलिंद आणि अंकिताने त्यांच्यातील प्रेमातून सर्वांची तोंडे बंद केली. -
लॉकडाउनमध्ये घरातच अकिंताचा वाढदिवस साजरा केला होता. आता अनलॉक झाल्यानंतर विदेशवारीसाठी कपल गेलं आहे.
-
अंकिता आणि मिलिंद यांनी करोना विषाणूपासून वाचण्यासाठी मास्कचा वापर केला आहे.
-
विमानातून जातानाचेही फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
'आयर्न मॅन', 'फिटनेस फ्रीक' अशा विविध नावांनी अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण ओळखला जातो.

Donald Trump : अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहाय्यकाने दिले मोठे संकेत; म्हणाले, “दोन्ही देश…”