-
१९९३ वर्षी रिलीज झालेल्या 'रंग' चित्रपटातील 'तुझे ना देखूं तो चैन' आजही लोकांच्या लक्षात असून अनेक ठिकाणी ते ऐकायलाही मिळतं.
-
या गाण्याची सुंदर शब्दरचना, संगीत, दिव्या भारती यांच्याशिवाय अजून एक गोष्ट लक्षात राहते तो म्हणजे चित्रपटाचा हिरो.
-
अभिनेता कमल सदानाची ही ओळख मात्र तेवढ्यापुरतीच मर्यादित राहिली.
-
कमल सदानाचा काजोलसोबत आलेला पहिला चित्रपट 'बेखुदी' फार काही चालला नाही.
-
पण पुढच्या वर्षी रिलीज झालेल्या 'रंग' चित्रपटातील काम प्रेक्षकांना आवडलं. यानंतर कमल अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसला, पण त्याला यश मिळालं नाही.
-
कमल सदानाच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात जबरदस्त झाली, पण त्याच्या आयुष्यातील एका घटनेमुळे बसलेल्या धक्क्यातून तो शेवटपर्यंत सावरला नाही. याचा परिणाम त्याच्या बॉलिवूड करिअरवरदेखील झाला.
-
२१ ऑक्टोबर १९७० मध्ये जन्मलेल्या कमल सदानाचं संपूर्ण कुटुंबच त्याच्या वाढदिवशी संपलं.
-
कमलच्या २० व्या वाढदिवशी त्याचे वडील जे प्रसिद्ध निर्मातादेखील होते त्यांनी त्याच्या डोळ्यासमोर आई आणि बहिणीची गोळी घालून हत्या केली होती.
-
कमलची आई आणि वडिलांमध्ये नेहमी भांडण होत असे. कमलच्या वाढदिवशीदेखील दोघांमध्ये जोरदार भांडण झालं.
-
यानंतर त्याच्या वडिलांनी आपल्या बंदुकीने पत्नी आणि मुलीला गोळ्या घातल्या. दोघींचाही जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यांनी स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.
-
आपल्या डोळ्यांसमोर हे सर्व झाल्याने कमलच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला होता. यानंतर त्याला समुपदेशनचं सहाय्य घ्यावं लागलं होतं. महत्त्वाचं म्हणजे कमलला आजपर्यंत आपल्या वडिलांनी असं का केलं हे माहिती नाही.
-
चित्रपटांमध्ये यश न मिळाल्याने कमलने टीव्हीमध्ये आपलं नशीब आजमावलं होतं. त्याने निर्माता म्हणूनही काम केलं. २००७ मध्ये त्याने 'कर्कश' नावाचा एक चित्रपट केला. याशिवाय २०१४ मध्ये 'रोर' नावाचा एक चित्रपट तयार केला. पण तो फ्लॉप झाला.

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य