सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री पूजा सावंत हे नाव आता कलाविश्वासाठी नवीन राहिलेलं नाही. मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही पूजाचं नाव बहरु लागलं आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. पूजा सावंतने साडीवरील फोटो आपल्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत. त्यापैकी काही मोजके फोटो पाहूयात… पूजा सावंतचं साडीत सौंदर्य अधिकच खुलून दिसतेय. पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिने केलेल्या उत्कृष्ट अभिनयानंतर तिच्या वाट्याला अनेक दर्जेदार भूमिका आल्या. ‘आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. साडीत पूजाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. लवकरच पूजा सावंत 'दगडी चाळ-२ ' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूजा आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. पूजा सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. -
सर्व फोटो पूजा सावंत हिच्या instagram खात्याहून घेतले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”