दिलखेचक अदा आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलीन फर्नांडिस. सोशल मीडियावर सक्रीय असलेली जॅकलीन कायमच तिच्या मनमिळाऊ स्वभावगुणामुळे चर्चेत असते. ( सौजन्य : जॅकलीन फर्नांडिस इन्स्टाग्राम) सकारात्मक विचार आणि सगळ्यांशी आदराने वागण्याच्या स्वभाव यामुळे ती चाहत्यांसोबतच सेटवरील अनेकांची आवडती अभिनेत्री झाली आहे. अलिकडेच जॅकलीनने दसऱ्याच्या निमित्ताने तिच्या स्टार मेंबरला एक खास गिफ्ट दिलं. विशेष म्हणजे जॅकलीने दिलेलं गिफ्ट हे अनेकांना थक्क करणारं होतं. कोणताही सणवार असो किंवा तिच्या आयुष्यातील एखादा चांगला क्षण ती कायमच तिच्या स्टाफमेंबरसोबत तो दिवस, सण सेलिब्रेट करताना दिसते. त्यामुळेच दसऱ्याचं निमित्त साधत जॅकलीनने तिच्या एका स्टार मेंबरला खास गिफ्ट दिलं आहे. विशेष म्हणजे जॅकलीनने कलाविश्वात पदार्पण केल्यापासून तिचा हा सहकारी तिच्यासोबत आहे. त्यामुळे तिने हे खास गिफ्ट त्यांना दिलं आहे. दसऱ्याचं निमित्त साधत जॅकलीनने तिच्या स्टाफ मेंबरला एक कार गिफ्ट केली आहे, असं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या स्टाफ मेंबरसाठी जॅकलीनने गाडी बुक केली होती. मात्र,तिची डिलेव्हरी कधी होणार हे तिलादेखील निश्चितपणे माहित नव्हतं. त्यामुळे तिच्या चित्रपटाच्या सेटवरच या गाडीची अचानकपणे डिलीव्हरी झाली. सध्या जॅकलीन तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच ही गाडी सेटवर आली. त्यावेळी जॅकलीन चित्रपटातील भूमिकेत म्हणजे एका वाहतूक पोलिसांच्या वेशात होती. चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असल्यामुळे जॅकलीनने वाहतूक पोलिसांच्या वेशातच या गाडीची पूजा केली आणि तिच्या स्टाफ मेंबरला ती गिफ्ट केली. जॅकलीन कायमच तिच्या स्टाफ मेंबरमध्ये लोकप्रिय असून ती एक कुल अभिनेत्री म्हणूनही लोकप्रिय आहे. यापूर्वी जॅकलीनने तिच्या एका मेकअप आर्टिस्टालादेखील असंच महागडं गिफ्ट दिल्याचं म्हटलं जातं. सध्या जॅकलीन तिच्या आगमी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिने लागोपाठ काही चित्रपटांची घोषणा केली आहे. जॅकलीन लवकरच 'किक 2', 'सर्कस' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. -
जॅकलीन तिच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत कायमच तिच्या फिटनेसकडे लक्ष देत असते.
-
अभिनयासोबतच तिला चित्रकला, घोडेस्वारी असे अनेक छंद आहेत.
-
सध्या जॅकलीन तिच्या चित्रपटांसह खास म्युझिक अल्बम आणि फोटोशूटसाठी देखील चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.

भाजपाच्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; विधानसभा अध्यक्षही पद सोडणार? कारण काय?