'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेचा नुकताच साखरपुडा पार पडला. मेहुल पै या उद्योजकाशी ती लग्नगाठ बांधणार आहे. मेहुल आणि अभिज्ञा एकाच कॉलेजमध्ये होते आणि गेल्या पंधरा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. अभिज्ञा आणि मेहुल दोघांचाही घटस्फोट झाला आहे. दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. -
"आम्हा दोघांनाही भूतकाळातील नात्यांमध्ये जो काही अनुभव आला, त्यानंतर मोठा समारंभ किंवा कार्यक्रम वगैरे करायचा नव्हता.", असं अभिज्ञा 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
२०१४ मध्ये अभिज्ञाचं वरुण वैटिकरसोबत लग्न झालं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. पुढच्या वर्षी अभिज्ञा व मेहुल लग्नगाठ बांधणार आहेत.

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य