बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून कायमच बिपाशा बासूकडे पाहिलं जातं. आपल्या मादक अदा आणि अभिनय यांच्या जोरावर बिपाशाने अनेकांना घायाळ केलं. ( सौजन्य : बिपाशा बासू फेसबुक पेज) आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. खरं तर आता बिपाशाचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, तरीदेखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असल्याचं दिसून येतं. कलाविश्वापासून काही काळ फारकत घेतलेल्या बिपाशाने डेंजरस या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक केलं. यावेळी तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या करिअरमधील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यातच तिने अभिनेता आर. माधवनसोबत दिलेल्या हॉट सीननंतर नेमकं काय घडलं हे सांगितलं. 'जोडी ब्रेकर्स' या चित्रपटात बिपाशा आणि आर. माधवन या दोघांनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात या दोघांचे काही हॉट सीन असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे हे सीन करताना बिपाशा प्रचंड घाबरल्याचं तिने सांगितलं. 'जोडी ब्रेकर्स'मध्ये इंटीमेट सीन देत असताना मी प्रचंड घाबरले होते. विशेष म्हणजे माझी भीती इतकी वाढली की त्यामुळे ताप आला'. 'आर. माधवन माझा खूप चांगला मित्र आहे, मी त्याला भावाप्रमाणे मानते. त्यामुळे त्याच्यासोबत किसिंग सीन वगैरे कसे द्यायचे हा विचार करुनच मला धडकी भरली'. बिपाशा २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अलोन चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब असल्याचे पाहायला मिळते. ( सौजन्य : बिपाशा बासू फेसबुक पेज) ( सौजन्य : बिपाशा बासू फेसबुक पेज) ( सौजन्य : बिपाशा बासू फेसबुक पेज) ( सौजन्य : बिपाशा बासू फेसबुक पेज) ( सौजन्य : बिपाशा बासू फेसबुक पेज)

शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘अशी चिक मोत्याची माळ’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक