इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतातील टॉप ३ जणांमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपलं स्थान पक्क केलंय. दीपिका पदुकोणला मागे टाकत श्रद्धाने तिसरं स्थान पटकावलंय. सध्या भारतात सर्वाधिक फॉलोअर्स असलेला सेलिब्रिटी हा क्रिकेटर विराट कोहली आहे. इन्स्टाग्रामवर विराटचे तब्बल आठ कोटी २२ लाख फॉलोअर्स आहेत. विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आहे. प्रियांकाचे पाच कोटी ८१ लाख फॉलोअर्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर पाच कोटी ६४ लाख फॉलोअर्स आहेत. तर दीपिकाच्या फॉलोअर्सची संख्या पाच कोटी २३ लाख इतकी आहे. आलिया भट्टचे पाच कोटी एक लाख फॉलोअर्स आहेत. लग्नामुळे चर्चेत असलेली गायिका नेहा कक्करचे चार कोटी ८२ लाख फॉलोअर्स आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारला इन्स्टाग्रामवर चार कोटी ६८ लाख नेटकरी फॉलो करतात. अक्षय कुमारनंतर जॅकलिन फर्नांडिसचा क्रमांक येतो. जॅकलिनचे चार कोटी ६२ लाख फॉलोअर्स आहेत. तर कतरिना कैफचे चार कोटी ४८ लाख फॉलोअर्स आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही इन्स्टाग्रामवर चार कोटी ९७ लाख फॉलोअर्स आहेत.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात