वय हा केवळ एक आकडा असतो हे अभिनेता मिलिंद सोमणकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. ( सौजन्य : मिलिंद सोमण फेसबुक पेज ) वयाची ५० ओलांडलेला हा अभिनेता आजही फिट असल्याचं दिसून येतं. फिटनेसच्या बाबतीत सजग असणाऱ्या मिलिंदची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. त्यामुळेच आज तो ‘फिटनेस फ्रिक’, ‘आयर्न मॅन’ अशा नावांनी ओळखला जातो. फिटनेसच्या बाबतीत तरुणाईचा आदर्श असणारा मिलिंद एकेकाळी व्यसनाधीन असल्याचं त्याने 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. मिलिंदला सिगारेट ओढण्याचं व्यसन होतं. दिवसाकाठी ३० सिगारेट ओढणाऱ्या मिलिंदला या व्यसनावर मात करणं अत्यंत कठीण होतं. मात्र, त्याने जिद्दीने या व्यसनावर मात मिळवली. कोणतंही व्यसन सोडवणं हे कठीण असतं. मात्र, सिगारेट सोडण्यासाठी त्याने एक वेळापत्रक तयार केलं होतं. आजही मिलिंद या वेळापत्रकाचं काटेकोरपणे पालन करतो. फिट राहण्यासाठी मिलिंद शक्यतो पौष्टिक आणि सकस पदार्थ खाण्यावर भर देतो. मिलिंद सकाळी भरपूर नाश्ता करतो. मात्र, नाश्त्यापूर्वी तो बदाम खातो. मिलिंद साखर किंवा साखरेपासून तयार केलेले पदार्थ खात नाही. त्याला पर्याय म्हणून तो गुळ किंवा मधापासून तयार केलेले पदार्थ खातो. प्रोसेस्ड किंवा ओव्हर प्रोसेस्ड पदार्थदेखील तो खात नाही. विशेष म्हणजे तो बिस्कीट सुद्धा खात नाही. त्याऐवजी तो फळं खातो.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”