-
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता फराज खान याचा मृत्यू झाला आहे. तो ४६ वर्षांचा होता. गेल्या काही वर्षांपासून तो मेंदूच्या आजारामुळे त्रस्त होता. बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या फोटो गॅलरीत आपण फराजचे काही गाजलेले चित्रपट पाहणार आहोत.
-
फरेब – १९९६ साली या चित्रपटातून फराजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
पृथ्वी – हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती.
-
लव्ह स्टोरी – हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती.
-
मेहंदी – १९९८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे फराज खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या चित्रपटात त्याने राणी मुखर्जीच्या पतीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही सर्वांच्या लक्षात आहे.
-
दुल्हन बनु मैं तेरी – हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात फराजने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.
-
दिल ने फिर याद किया – गोविंदा आणि तब्बूच्या धमाल जोडीमुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात फराजने खलनायकाची भूमिका साकारली होती.
-
बाझार मार्केट ऑफ लव्ह, लस्ट अँड डिझायर – २००४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट थोड्या वेगळ्या धाटणीचा होता. वेश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर असणाऱ्या या चित्रपटाने त्याने खळबळ माजवली होती.
-
चांद बुझ गया – हा चित्रपट फराजच्या फिल्मी करिअरमधील शेवटचा चित्रपट होता. सलग आठ सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करुनही त्याला २००८ नंतर फारस काम मिळालं नाही. त्यामुळे त्याने चित्रपटांऐवजी छोट्या पडद्याकडे आपलं लक्ष वळवलं.
-
शूssssss कोई है या भयपट मालिकेत त्याने खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याने साकारलेल्या मायाकाल या व्यक्तिरेखेमुळे ही मालिका त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती.
-
त्यानंतर रात होने को है, करिना करिना, सिंदूर तेरे नाम का यांसारख्या काही डेलीसोपमध्येही तो झळकला होता.

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख