दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अनुष्काने अनेकांची मनं जिंकली आहेत. ( सौजन्य : सर्व फोटो इंडियन एक्स्प्रेस) १५ वर्षांहून अधिक काळ दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अनुष्काने 'बाहुबली','अरुंधती','बेदम' आणि 'रूद्रमा देवी' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कोणतीही भूमिका असली तरी अनुष्का ती उत्तमरित्या साकारते. त्यामुळेच आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अशाच काही गाजलेल्या भूमिका पाहुयात. बाहुबली (२०१७) – बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेला चित्रपट म्हणजे 'बाहुबली'. या चित्रपटात अनुष्काने देवसेना ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्या लूकसोबतच तिच्या अभिनयाचंही विशेष कौतूक झालं. भागमती (२०१८) – 'भागमती' या चित्रपटात अनुष्काने चंचला ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील अनुष्काची भूमिका प्रचंड गाजली असून तिच्या लूकची सर्वाधिक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. राणी रुद्रमा देवी (२०१५) 'रुद्रमा देवी' या चित्रपटात अनुष्काने राणी रुद्रमा देवी ही मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित झाला असून त्याने अफाट लोकप्रियता मिळवली. या चित्रपटात अनुष्कासोबत अल्लू अर्जुन आणि राणा डग्गुबती यांनीही स्क्रीन शेअर केली आहे. वेदम (२०१०) – 'वेदम' या चित्रपटात अनुष्काने सरोज ही भूमिका साकारली. अरूंधती (२००९) – अरुंधती या चित्रपटात अनुष्काने जयजम्मा ही मुख्य भूमिका साकारली. उत्तम अभिनयाने अनुष्का घराघरात पोहोचली. हा चित्रपट २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. मिर्ची (२०१३) – 'मिर्ची' या चित्रपटात अनुष्काने वीनूची भूमिका साकारली आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासदेखील मुख्य भूमिकेत झळकला आहे. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य