सौंदर्याची परिभाषा ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. माणूस कोणत्याही वयात सुंदर दिसतो, कारण सौंदर्याचं वयाशी काही घेणंदेणं नसतं. अनेक मराठी अभिनेत्रींनी हे सिद्ध केलं आहे. तेजस्वी हास्य, मोहक, आकर्षक व्यक्तीमत्त्वासमोर त्यांच्या वयाचा अंदाज बांधणं खरंच कठीण आहे. ऐश्वर्या नारकर- जवळपास दशकभरापासून मराठी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या ऐश्वर्या नारकर या ५० वर्षांच्या आहेत. त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून इन्स्टाग्रामवर त्यांचे सुंदर फोटो पाहायला मिळतात. निवेदिता सराफ- 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत आसावरीची भूमिका साकारणाऱ्या निवेदिता सराफ या ५५ वर्षांच्या आहेत. शूटिंगचं कितीही व्यग्र वेळापत्रक असलं तरी वर्कआऊटसाठी त्या आवर्जून वेळ काढतात. श्वेता शिंदे- डॉक्टर डॉन मालिकेत भूमिका साकारणारी श्वेता ४० वर्षांची आहे. मात्र अजूनही श्वेताचं सौंदर्य भुरळ पाडणारं आहे. क्रांती रेडकर- ३८ वर्षांची क्रांती इन्स्टाग्रामवर तिच्या मजेशीर व्हिडीओंमुळे चर्चेत असते. अभिनयाव्यतिरिक्त क्रांती दागिन्यांचा व कपड्यांचा व्यवसाय करते. सुप्रिया पिळगावकर- ५३ वर्षांच्या सुप्रिया पिळगावकर या आजही त्यांच्या हास्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. सोशल मीडियावर सुप्रिया यांनी काही दिवसांपूर्वी डान्सचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नेटकऱ्यांना तो फारच आवडला आणि त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव झाला होता. मृणाल कुलकर्णी- ४९ वर्षांच्या मृणाल कुलकर्णींना पाहून आजही 'सोनपरी' या मालिकेची आठवण होते. छोट्या व मोठ्या पडद्यावर मृणाल कुलकर्णी अजूनही दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. चिन्मयी सुमीत- 'जीव झाला येडापिसा' या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या चिन्मयी ४७ वर्षांच्या आहेत.

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा