पती गौतम किचलूसोबत मालदीवला हनीमूनला गेलेल्या अभिनेत्री काजल अगरवालने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. लोकप्रिय 'टूरिस्ट डेस्टिनेशन' असलेल्या मालदीवच्या समुद्रात काजल आणि गौतमने स्नॉर्कलिंगचा अनुभव घेतला. -
एकमेकांचा हात धरून अंडरवॉटर स्विमिंग करताना काढलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
काजलने काळ्या रंगाचा स्विमसूट तर गौतमने निळ्या रंगाचे ट्रंक्स घातले आहेत. समुद्र प्रचंड आवडत असल्याचं काजलने या फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगितलंय. 'समुद्रासोबत एकटे राहा आणि इथे तुम्हाला अस्तित्वात नसलेल्या प्रश्नांचीही उत्तरं सापडतील', असं कॅप्शन तिने दिलंय. याआधी काजलने अंडरवॉटर हॉटेल रुममधील फोटो पोस्ट केले होते. हनीमूनसाठी मालदीवमध्ये पोहोचल्यापासून काजल सतत तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. मालदीवमध्ये राहण्यासाठी काजल आणि पती गौतमने The Muraka या रिसॉर्टची निवड केली आहे. -
समुद्राचं निळंशार पाणी आणि मासे पाहण्यात मग्न झालेली काजल
-
अंडरवॉटर हॉटेल रुममधील काजलचे फोटो
मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये काजल व गौतमचा विवाहसोहळा पार पडला. -
काजलच्या लग्नाला मोजक्यात पाहुण्यांनी हजेरी लावली होती.
-
जून महिन्यात काजलचा साखरपुडा पार पडला होता.
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, काजल अगरवाल

Krishna Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images